आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Why Treasury Benches Are Seeing Almost 100 Pc Attendance

पीएम नरेंद्र मोदींची भीती? सभागृहात असते संपूर्ण भाजप खासदारांची उपस्थिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वच भाजप खासदारांना भीती असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. लोकसभेच प्रश्नोत्तराच्या काळात असलेल्या खासदारांच्या 100 टक्के उपस्थितीवरून हे लगेचच लक्षात येत आहे. सुत्रांनी ददिलेल्या माहितीनुसार, मोदींनी प्रथमच खासदार बनलेल्या सदस्यांना लोकसभेच्या कामकाजासाठी उपस्थिती राहण्यासाठी खास निर्देश दिले होते. अन्यथा कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला होता. एका ज्येष्ठ भाजप खासदाराने तर मोदींनी आपल्या गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या 13 वर्षांच्या कार्यकाळातील गुजरात विधानसभा मॉडेल लागू केल्याचेही म्हटले आहे. गुजरात विधानसभेच नेहमी सदस्‍यांची 100 टक्के उपस्थिती असायची. यूपीएच्या कार्यकाळात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी निर्देश देऊनही अनेक खासदार आणि केंद्रीय मंत्रीही संसदेच्या कामकाजावेळी गायब असायचे.

सेंट्रल हॉलचे आकर्षण संपले?
संसदेचा सेंट्रल हॉल नेहमीच राजकीय गॉसिपचे केंद्र मानले जात होते. येथे ज्येष्ठ खासदार पत्रकारांबरोबर गप्पा मारताना गोपनीय माहिती किंवा विरोधकांशी संबंधित माहिती लीक करायचे असे, म्हटले जाते. मात्र नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात सेंट्रल हॉलचे हे आकर्षण कमी होत अशल्याचे चित्र आहे. प्रथमच खासदार बनलेल्या सदस्यांना या एका महिन्याच्या कार्यकाळात सेंट्रल हॉलच्या या अलिखित परंपरेबाबत माहिती मिळाली असली तरी, त्यांना गॉसीपपासून दूर राहणेच पसंत केले आहे. तर ज्येष्ठांमध्येही अर्थमंत्री अरुण जेटली वगळता इतर एकही केंद्रिय मंत्री सेंट्रल हॉलमध्ये पत्रकारांशी चर्चा करायला उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. विरोधी खासदारांमध्येही ही क्रेझ कमी झाल्याचे दिसते आहे. मंगळवारीही सोनिया गांधी जेव्हा परत निवासस्थानाकडे चालल्या होत्या, त्यावेळीही एकही काँग्रेस खासदार सेंट्रल हॉलमध्ये उपस्थित नसल्याचे चित्र होते.
फाइल फोटो : संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजप खासदारांना मार्गदर्शन करताना नरेंद्र मोदी