आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगलादेशात बॉलिवूड चित्रपटांवर बंदी ? #WhyBanBollywood ट्रेंडिगमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बांगलादेशात बॉलिवूड चित्रपटांवर कथित बंदी घालण्यात आल्याच्या विरोधात सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवर कॉमेंट्स युद्ध सुरु आहे. मंगळवारी दिवसभ #WhyBanBollywood ट्रेंडिगमध्ये क्रमांक एकवर आहे. बांगलादेशात बॉलिवूड चित्रपट आणि संगीतावर बंदी घातल्याच्या सांगितले जात आहे. मात्र त्याबाबत बांगलादेश सरकारने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
का आहे ट्रेंडिंगमध्ये
बांगलादेशात बॉलिवूड चित्रपटांवर बंदी घातली आहे, किंवा नाही याबद्दल अधिकृत माहिती नाही. मात्र काही दिवसांपूर्वी तेथील एका कोर्टाने एक निर्णय दिला होता. त्या निर्णयात कथितरित्या म्हटले गेले होते, की भारतीय चित्रपट, त्यांची गाणी आणि गाण्यांचे रिंगटोनवर बंदी घालण्यात आली आहे.

बांगलादेशातील मोबाइल फोन ऑपरेटर्सला निर्देश देण्यात आले होते, की बॉलिवूड गाण्यांचा समावेश व्हॅल्यू अॅडेड सर्व्हिसेस (व्हीएएस) मध्ये करु नये. म्यूझिक इंडस्ट्री ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अरिफूर रहमान आणि जनरल सेक्रेटरी एस.के.शाहिद अली यांनी दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने हा निर्णय दिला होता. BDNews24.com या बांगलादेशी वेबसाइटने अशा आशयाची बातमी देखील दिली होती.
बांगालादेशातील चित्रपट उद्योगावर परिणाम होतो, असे कारण देत याआधी बांगलादेशात भारतीय चित्रपटांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, आयात धोरणात बदल झाल्यानंतर 2013 पासून ही बंदी उठवण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...