आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनारस घाट, ताजमहालानंतर नाशिक कुंभमध्येही वायफाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नक्षलग्रस्त भागात ब्रॉडबँड आणि दूरसंचार सेवा देण्यासाठी सरकार ऑप्टिकल फायबरऐवजी वायफाय तंत्रज्ञानाचा वापर करू शकते. यामुळे या भागांमध्ये ऑप्टिकल फायबरची देखरेख-दुरुस्ती आणि टाॅवर्सची निगराणी कठीण झाली आहे. एक अधिकारी म्हणाला, नक्षलग्रस्त झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल व अन्य राज्यांमध्ये वायफाय तंत्रज्ञानाचा उपयोग ब्रॉडबँड आणि अखंडित दूरसंचार सेवांसाठी होऊ शकतो का याची शक्यता सरकार तपासत आहे.

केंद्रीय दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी राज्यांच्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीत याबाबतचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणार्‍या नाशिक कुंभमेळ्यातही बीएसएनएलने वायफाय सेवा देण्याची तयारी सुरू केली आहे. वायफाय सेवा हॉट स्पॉटच्या माध्यमातून उपलब्ध केली जाईल. एक हॉट स्पॉट जवळपास ३ हजार व्यक्तींना एकाच वेळी सेवा देऊ शकतो. पहिली ३० मिनिटे सेवा मोफत असेल. यानंतर कुपन खरेदी करावे लागेल.
बातम्या आणखी आहेत...