आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Widows Pension Criteria Change, If Joint Account Opened , Then Not Need 14 Form

विधवांच्या पेन्शनचे निकष बदलले, संयुक्त खाते असेल तर फॉर्म 14 ची गरज नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कौटुंबिक निवृत्तिवेतन मिळवण्यासाठी काही प्रकरणात विधवांना दोन राजपत्रित अधिका-यांसमोर उपस्थित राहण्याची अट सरकारने काढून टाकली आहे.


पतीच्या मृत्यूनंतर विधवांना फॉर्म 14 मार्फत निवृत्तिवेतन मिळवणे अडचणी ठरत असल्याच्या अनेक तक्रारी सार्वजनिक तक्रार, कार्मिक व निवृत्तिवेतन मंत्रालयाकडे प्राप्त झाल्या. विधवांना राजपत्रित अधिका-यांसमोर उभे राहणे अवघडल्यासारखे व लाजिरवाणे वाटते, असा तक्रारींचा सूर होता. निवृत्तिवेतनधारक व पत्नीचे संयुक्त खाते असेल तर अशा प्रकरणात अन्य कोणी निवृत्तिवेतनासाठी हक्क सांगण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे या प्रकरणातील विधवांना फॉर्म 14 भरून देण्याची गरज राहणार नाही. पत्नी एका साध्या अर्जावर पतीच्या निधनाची माहिती बॅँकेला देऊन निवृत्तिवेतन सुरू ठेवण्यास सांगू शकते. कर्मचारी पती, पत्नीच्या निधनानंतर त्याने किंवा तिने मृत्यूचे प्रमाणपत्र, पेन्शन पेमेंट ऑर्डर, जन्मतारखेचा दाखला तसेच अतिरिक्त वेतनाच्या वसुलीबाबतचे हमीपत्र देणे आवश्यक असल्याचे कार्मिक मंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे. पती-पत्नीचे संयुक्त खाते नसेल तर अशा प्रकरणात फॉर्म 14 अंतर्गत निवृत्तिवेतन मंजूर होईल.


कौटुंबिक निवृत्तिवेतन सुरू करण्यापूर्वी पत्नीची वैयक्तिक माहिती, स्वाक्षरी, ओळख चिन्ह, डाव्या हाताच्या अंगठ्याच्या ठशासोबत वर नमूद केलेली प्रमाणपत्रे बॅँकेने जमा करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारचे साधारण 30 लाख निवृत्तिवेतनधारक आहेत.