आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wife Has Right To Know Husband Salary, Central Information Commission Order

पतीच्या पगाराची माहिती घेण्याचा पत्नीला हक्क, केंद्रीय माहिती आयोगाचा आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सरकारी कर्मचार्‍यांच्या पत्नीला पतीचा पगार किती याबाबत माहिती मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे.
कार्यालयाने आपल्या पातळीवर माहिती उघड करावी. कायद्याने तसे करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करत केंद्रीय माहिती आयोगाने आदेश दिले.

माहिती आयुक्त एम. श्रीधर आचार्युलू म्हणाले, जोडीदाराविषयी माहिती जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला असतो. लोक कर भरतात व त्यातूनच सरकारी कर्मचारी, अधिकार्‍यांचे पगार दिले जातात. वेतनाशी संबंधित माहिती कायद्यानुसार जाहीर केली जावी. सॅलरी थर्ड पार्टी इन्फर्मेशन असल्याचे सांगून कोणीही यासंबंधी अर्ज फेटाळू शकत नाही. नकार दिल्यास दंड होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला.