आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआम आदमी पार्टीने दिल्लीत अभूतपूर्व यश मिळविले. परंतु, 'आप'च्या एका आमदारावर पराभूत कॉंग्रेस उमेदवाराच्या पत्नीने विनयभंगाचा आरोप केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरु केली आहे. परंतु, या आरोपांमुळे 'आप'चे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. सीमापुरी मतदारसंघातून निवडून गेलेले आमदार धर्मेंद सिंह कोली यांच्याविरुद्ध वीर सिंह धीगन यांच्या पत्नीने आरोप केला आहे. कोली यांनी त्याचाच पराभव केला. निवडणूक जिंकल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी काढलेल्या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांनी घरात घुसून छेडखानी केली, असा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.
धर्मेंद्र कोली यांनी यासंदर्भात प्रतिक्रीया देताना सांगितले, की आम आदमी पार्टीचे काही कार्यकर्ते आणि समर्थक धर्मेंद्र सिंह कोली यांच्या विजयाची मिरवणूक काढत असताना ढिंगन यांच्या घरासमोर काही उत्साही कार्यकर्त्यांनी फटाके वाजवले आणि विजयाच्या घोषणा देत मिरवणूक पुढे गेली. मिरवणुकीत अडीच हजारांपेक्षा जास्त कार्यकर्ते होते. मी ज्या जीपवर उभा होतो, त्यावर 12 जण होते. मी जीपखाली उतरूच शकत नव्हतो. त्यामुळे असला कोणताही प्रकार घडलेलाच नाही. हा माझ्याविरुद्ध कट असून पराभव न पचल्यामुळे असा आरोप करण्यात आला आहे.
कोण आहे धर्मेंद्र कोली... जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.