आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीला आई-वडिलांपासून वेगळे होण्यास भाग पाडत असेल तर पत्नीचे क्रौर्यच, पती घेऊ शकतो घटस्फोट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निकाल दिला आहे. पत्नी केवळ पतीच्या पैशावर चैन करण्यासाठी पतीस आई-वडील व कुटुंबापासून विभक्त होण्यास भाग पाडत असेल तर ते क्रौर्यच मानले जाईल. याच आधारे पती पत्नीला घटस्फोट देऊ शकतो.

पतीवर खोटे आरोप, विवाहबाह्य संबंध, आत्महत्येची धमकी देणे हे पण एक मानसिक क्रौर्यच आहे. हा पण घटस्फोटाचा आधार ठरू शकतो. नरेंद्र विरुद्ध कुमारी मीरा प्रकरणात कोर्टाने हा निकाल दिला. यात पतीने २४ वर्षांचा आपला संसार मोडून वेगळे होण्याची परवानगी मागितली होती. न्या. ए. आर. दवे आणि न्या. एल. एन. राव यांच्या न्यायपीठासमोर ही सुनावणी झाली. हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक हायकोर्टाचा निकाल रद्दबातल ठरवला. पतीचे उत्पन्न कुटुंबाऐवजी स्वत:वरच खर्च करावे, ही पत्नीची इच्छा हायकोर्टाने ग्राह्य धरली होती. विशेष म्हणजे सत्र न्यायालयाने नेमका याविरुद्ध निकाल दिलेला होता.

पत्नीची वारंवार आत्महत्येची धमकी हे क्रौर्य असल्याचा सत्र न्यायालयाचा निष्कर्ष योग्य असल्याचे स्पष्ट करून कोणताही पती पत्नीचे हे वागणे सहन करू शकणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले. समजा पत्नीने धमकी देऊन नंतर आत्महत्या केलीच, तर पतीचे काय हाल होतील, त्याचे मानसिक स्वास्थ्य, करिअर आणि जीवनच उद््ध्वस्त होईल, असे न्यायपीठाने नमूद केले.

न्यायपीठाने म्हटले आहे की, साधारण परिस्थितीत पत्नी पतीसोबत त्याच्या कुटुंबीयांसह राहते. मात्र, पत्नी आपल्या पतीस आई-वडिलांपासून वेगळे राहण्यास सांगत असेल तर त्याचे ठोस कारण हवे. पतीचे मोलकरणीशी अनैतिक संबंध असल्याचा पत्नीने केलेला आरोपही खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे.

आमच्या मते, केवळ आपलाच आधार असलेल्या वृद्ध माता-पित्यांना किंवा कुटुंबीयांना सोडून कोणताच पती वेगळे राहू शकणार नाही. या स्थितीत पत्नीचे वागणे पतीसाठी भीतिदायक आणि घातकही ठरू शकते. या पद्धतीने छळ होत राहिला तर पतीचे जीवनच उद््ध्वस्त होऊ शकते. - सुप्रीम कोर्ट
बातम्या आणखी आहेत...