आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • WikiLeaks: American Mole In Indira Gandhi\'s Household During Emergency

इंदिरा गांधींच्या घरात राहत होता अमेरिकन गृप्तहेर; विकिलीक्सचा आणखी एक खुलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दि‍ल्‍ली- गांधी कुटूंबामागील शुक्लकास्ट संपण्याचे चिन्हे नसताना सोनि‍या गांधींना कर्नाटक हायकोर्टाने नोटिस बजावली आहे. तर दुसरीकडे गोपनिय माहिती प्रसिद्ध करणारी वेबसाइट 'वि‍कीलीक्‍स' इंदि‍रा गांधींबाबत एक मोठा खुलासा केला.

आणबाणीच्या काळात इंदि‍रा गांधींच्या घरात अमेरिकन गृप्तहेर वास्तव्यास होता. इंदिरा गांधींचे राजकारण तो समजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा खुलासा करून '‍विकिलीक्स'ने पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. सन 1975 ते 1977 दरम्यान इंदिरा गांधीच्या घरात अमेरिकन गृप्तहेर वास्तव्य करत होता. विकिलीक्सने यापूर्वी राजीव गांधी यांच्याबाबत खुलासा केला होता. राजीव गांधी स्वीडिश कंपनीचे एजेंट असल्याचे म्हटले होते.

वि‍कीलीक्‍सनुसार नवी दि‍ल्‍लीतील अमेरि‍कन दूतावासातर्फे अनेक वेळा जाहीर करण्‍यात आले होते की, तत्कालीन पंत‍प्रधान इंदिरा गांधीच्या घरात एक गृप्तहेर वावरत आहे. विकिलीक्सने यासाठी सन 1976 मध्ये जारी केलेल्या केबल्सचा (गोपनिय दस्तावेज) हवाला दिला आहे.

26 जून 1975 रोजी इंदि‍रा गांधींनी देशात आणीबाणी जाहीर केली होती. त्यानंतर दुसर्‍या दिवशीच अमेरि‍कन दूतावासाने एक केबलमध्ये इंदि‍रा गांधींची भूमिका आणि संजय गांधी तसेच त्यांचे सचिव आर.के.धवन यांच्या बाबतचे महत्त्वपूर्ण खुलासे जाहीर केले होते. इंदिरा गांधीच्या घरात वास्तव्य करणार्‍या गुप्तहेराने हेहीप्रमाणीत केले होते की, देशात‍ कॉंग्रेसचीच सत्ता यावी, यासाठी इंदिरा गांधीचे प्रयत्न सुरु होते.