आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wikileaks Claims To That Indira Gandhi Had Talked With Richard Nixon During 1971 War

1971 च्‍या युद्धादरम्‍यान इंदिरा गांधी आणि निक्‍सन यांच्‍या झाली होती चर्चाः विकिलीक्‍स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- भारताच्‍या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्‍यासंदर्भात विकि‍लीक्‍सने आणखी एक खुलासा केला आहे. भारत-पाकिस्‍तान युद्धापूर्वी 1971 मध्‍येच त्‍यांनी अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष रिचर्ड निक्‍सन यांच्‍यासोबत चर्चा केली होती. तुम्‍ही पाकिस्‍तानला पाठिंबा देत आहात, असे वाटत नसल्‍याचे इंदिरा गांधी निक्‍सन यांना त्‍यावेळी म्‍हणाल्‍या होत्‍या.

वि‍कि‍लीक्‍सने 1973 मधील अमेरिकच्‍या राजकीय कागदपत्रांच्‍या आधारे हा दावा केला आहे. भारत आणि पाकिस्‍तानात 1971 मध्‍ये युद्ध झाले होते. त्‍यावेळी इंदिरा गांधी आणि तत्‍कालीन अमेरिकन राजदूत पॅट्रीक मोयनिहॅन यांच्‍यात झालेल्‍या चर्चेचा या कागदपत्रांमध्‍ये उल्‍लेख आहे. मोयनिहॅन यांनी निक्‍सन यांच्‍या चिंतेबाबत इंदिरा गांधींना सांगितले होते. त्‍यावर इंदिरा गांधींनी निक्‍सन यांना उत्तर दिले होते. त्‍या म्‍हणाल्‍या होत्‍या, 'तुम्‍ही याहया (पाकिस्‍तानचे तत्‍कालीन लष्‍करशाहा याहया खान) यांच्‍यासोबत उभे असते तर पाकिस्‍तानसाठी तुम्‍हाला बरेच काही करता आले असते.

पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि वाचा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्‍याबाबत विकिलीक्‍सचा खुलासा...