आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wikileaks Denies Reports Of Calling Narendra Modi Incorruptible

प्रचाराचा अनोखा फंडा भाजपच्या अंगाशी? विकिलिक्सकडून भाजपवर हल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विकिलिक्सकडून नरेंद्र मोदींना प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र देणा-या भाजपच्या पोस्टरवरून वाद वाढत चालला आहे. 'विकिलिक्स'कडून सांगण्यात आले आहे, की त्यांनी कधीही मोदींना प्रामाणिक असल्याचे म्हटलेले नाही. यासंबंधी जे पोस्टर्स वाटले जात आहेत आणि सोशल मीडियावर यासंबंधीची सुरु असलेली चर्चा चुकीची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विकिलिक्सचे संस्थापक ज्यूलिअन असांज म्हणाले, 'भाजप पक्ष निधी गोळा करण्यासाठी असा खोटा प्रचार करीत आहे.' तर, भाजपनेही असांज यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव रामेश्वर चौरसिया यांनी आज (मंगळवार) विकिलिक्सच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. विकिलिक्सने पक्ष निधी गोळा करण्याचे पुरावे सादर केले तर त्याची चौकशी केली जाईल, असेही ते म्हणाले.
विकिलिक्सचा भाजपवर हल्ला
भाजपच्या प्रचारासाठी मोदी समर्थकांनी एक अनोखा फंडा वापरला आहे. त्यांनी एक पोस्टर प्रसिद्ध केले आहे. त्याचे सगळीकडे वितरण सुरु आहे. या पोस्टरमध्ये 'विकिलिक्स' या वेबसाइटचे संस्थापक ज्यूलिअन असांज यांच्या स्वाक्षरीने म्हटले आहे, "अमेरिका नरेंद्र मोदींना घाबरते, कारण अमेरिकेला माहित आहे की मोदी भ्रष्ट नाहीत." मात्र विकिलिक्सने मोदींचा हा दावा फेटाळून लावला आहे. विकिलिक्सने हे पोस्टर बनावट असल्याचे सांगितले आहे. त्याच बरोबर त्यांनी ट्विटकरुन असांज यांनी मोदींबद्दल असे कधीही म्हटले नसल्याचे स्पष्ट केले आहे. मोदी समर्थकांनी भाजपचा हा खोटा प्रचार चालवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पोस्टरचे नाही, मजकूराचा समर्थन - प्रीती गांधी
विकिलिक्सचा आरोप आहे, की ही पोस्टर्स भाजपच्या प्रीती गांधी यांनी तयार केली आहेत. प्रीती भाजपच्या मीडिया कम्यूनिकेशनच्या प्रमुख आहेत. प्रीती म्हणाल्या, की त्यांनी तो फोटो फक्त रिट्विट केला आहे.
प्रीती गांधी यांनी एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पोस्टर तयार केल्याचा आरोप फेटाळला आहे. त्या म्हणाल्या, 'मी त्या पोस्टरचे समर्थन करीत नाही मात्र, त्यातील मजकूराचे समर्थन करते.'
ट्विटरवर पसरवले जात असलेले पोस्टर तुम्ही तयार केले का, या प्रश्नावर
त्या म्हणाल्या, 'मी ते पोस्टर तयार केलेले नाही. मला ते ट्विट करण्यात आले होते. मी फक्त त्याला रिट्विट केले आहे. त्याचे पुरावे माझ्याकेड आहेत.' मला पोस्टर बनविता येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
(छायाचित्र - छायाचित्रातील पोस्टरवरुनच संपूर्ण वाद निर्माण झाला आहे.)
पुढील स्लाइडमध्ये, विकिलिक्सकडून पोस्टरवर केले गेलेले ट्विट.