आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्‍वीडीश कंपनीचे एजंट होते राजीव गांधी; \'विकिलीक्‍स\'चा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- जगभरातील गोपनीय तसेच गुप्त बातम्या प्रसिद्ध करणारी एक वादग्रस्त वेबसाइट 'विकिलीक्‍स'ने देशाचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबाबत एक खुलासा प्रसिद्ध करून खळबळ उडवून दिली आहे. 'विकि‍लीक्स'ने दावा केला आहे की, राजीव गांधी हे स्‍वीडनमधील एका कंपनीसाठी एजंट म्हणून काम करत होते. 'विकिलीक्‍स'चा हा खुलासा 'द हिंदू' या इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला आहे. 'विकिलीक्स'ने केलेल्या खुलाशात माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडीस यांचाही उल्लेख आहे.

'विकिलीक्‍स'नुसार राजीव गांधी यांनी देशाच्या पंतप्रधान पदाची सूत्रे स्विकारण्यापूर्वी ते इंडियन एअरलाईन्सचे वैमानिक होते. आपली नोकरी सांभाळून ते स्वीडनमधील 'साब स्‍कानिया' कंपनीचे एजेंट म्हणूनही काम करत होते. विकिलीक्‍सने हेही प्रसिद्ध केले आहे की, 70 च्या दशकात भारताला लढावू विमान विक्री करण्‍याचा 'साब स्कानिया' कंपनीचा हेतू होता. परंतु तो साध्य होऊ शकला नाही.

'विकिलीक्‍स'ने सन 1974 ते 1976 दरम्यान अनेक गुप्त माहित उघड केली आहे. त्यापैकी 21 ऑक्टोबर 1975च्या एका संदेशात राजीव गांधी हे स्वीडिश कंपनीचे एजेंट असल्याचा उल्लेख आहे.

देशाचे माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस यांच्याबाबतचा खुलासा वाचण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...