आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NIA समोर सर्वात मोठा प्रश्न, एवढी शस्त्रे घेऊन कसे घुसले दहशतवादी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हल्ल्यानंतर मारले गेलेले दोन दहशतवादी - Divya Marathi
हल्ल्यानंतर मारले गेलेले दोन दहशतवादी
नवी दिल्ली - पठाणकोट एअरबेसवरील हल्ल्यात 6 दहशतवादी मारले गेल्यानंतरही 45 स्फोट झाले. 27 मॅगझीन जप्त करण्यात आल्या. दहशतवादी एवढी शस्त्रास्त्रे घेऊन कसे घुसले याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करत आहे. त्यांना एअरबेसमधून काही मदत मिळाली का? याचा शोध घेतला जात आहे.

हल्ल्याच्या कित्येक तास आधी झाली होती घुसखोरी?
- दहशतवाद्यांनी पहिला गोळीबार 2 जानेवारी रोजी पाहाटे 3.30 वाजता केला होता. एका रिपोर्टनुसार, हल्ल्याच्या काही तास आधी दहशतवादी एअरबेसमध्ये घुसले होते.
- प्रश्न उपस्थित होत आहे, की 10 मीटर उंचीची संरक्षक भिंत आणि त्यावरील दोन मीटर उंचीचे तार कुंपण ओलांडून दहशतवादी आत कसे घुसले ?
- हा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे, कारण त्यांच्याकडे अवजड बॅग-पॅक होते.
- एवढ्या मोठ्या प्रमाणात बॅग-पॅक साहित्य दहशतवाद्यां कसे आले याचाही तपास एनआयए करत आहे.

का निर्माण झाले प्रश्न
- सूत्रांच्या माहितीनुसार, सुसाइड बॉम्बर आपल्यासोबत एवढे मोठे सामान घेऊन जात नाहीत. जर आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून हल्ला करायचा असेल तर कमीत कमी सामान सोबत ठेवले जाते. मात्र, पठाणकोट हल्ल्यात असे झालेले दिसत नाही.
- त्यामुळेच एनआयएला वाटत आहे, की दहशतवाद्यांना एअरबेसमधून काही मदत मिळाली का ? दहशतवाद्यांकडे शस्त्रांशिवाय औषधी आणि फुड पॅकेट्स देखिल होते.

... मग काय तस्करीच्या माध्यमातून पोहोचले होते शस्त्र
- एनआयएचा अंदाज आहे की एअरबेसमध्ये असे कोणी तरी असले पाहिजे ज्यांनी केवळ दहशतवाद्यांना आत घुसण्यात मदत केली नाही तर, तस्करीच्या माध्यमातून शस्त्र आणि स्फोटके आत पोहोचवले.
- एअरबेसमध्ये तीन हजार कुटुंब राहातात. पठाणकोटमध्ये अंमलीपदार्थ तस्करीचे रॅकेट सक्रिय आहे. एनआयए तपास या लोकांपर्यंत जाऊ शकतो.
- एनआयएचा कयास आहे, की पैशांची लालूच देऊन दहशतवाद्यांनी मदत घेतली असेल.

पुढील स्लाइडमध्ये पाहा फोटो..