आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी तीन वर्षांत गंगा नदी स्वच्छ करण्याचे उमा भारती यांनी दिले आश्वासन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - गंगा नदी
नवी दिल्ली - दिल्लीमधील यमुना नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी दिल्ली सरकारला मंत्रालयाचे पूर्ण सहकार्य राहणार असल्याचे आश्वासन उमा भारती यांनी दिले आहे. तसेच या कामात कोणत्याही प्रोटोकॉलचा अडथळा येणार नाही असेही उमा भारती म्हणाल्या. श्राद्धाच्या वेळी होणा-या विधीचा उल्लेख करताना त्यांनी गंगेचे पाणी अनेक ठिकाणी जनावरांच्या वापरण्याजोगेही राहिले नसल्याची खंत मांडली. तसेच तीन वर्षांच्या आता गंगा स्वच्छ करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
जलआपत्ती आणि व्यवस्थापणाच्या बाबतीत आयोजित एका चर्चासत्रात उमा भारती यांनी ही मते व्यक्त केली. विलुप्त झालेल्या सरस्वती नदीचा शोध घेण्यात काहीही कसर ठेवणार नसल्याच्या त्यांच्या संसदेत दिलेल्या वक्तव्यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्याचे उत्तर देताना उमा म्हणाल्या की, सरस्वतीला शोधण्यामागे धार्मिक भावना नाहीत, तर पाण्याच्या स्त्रोताचा शोध घेणे हे त्यामागील प्रमुख कारण आहे.

नदीजोड योजनेबाबत घेतल्या जाणा-या शंकांचाही त्यांनी उल्लेख केला. केंद्रीय जलसंपदा, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्री उमा भारती यावेळी म्हणाल्या की, नदी जोड योजनेने पर्यावरणाला कुठेही हानी पोहोचणार नाही याची काळजी घेतली जाईल. देशातील काही नद्या जोडण्याचे काम आगामी 10 वर्षांत पूर्ण केले जाईल. या योजनेमुळे देशात सर्वत्र नद्यांचे पाणी उपलब्ध असेल आणि, पुराच्या पाण्याचाही योग्य वापर केला जाईल.

ऑस्ट्रेलियाने देऊ केली मदत
दक्षिण ऑस्ट्रेलियाचे प्रमुख जे वेदरिल यांनी बुधवारी गंगा स्वच्छतेसंदर्भातील मोदींच्या महत्त्वाच्या योजनेसाठी आपल्या राज्यातील तज्ज्ञांची मदत देऊ केली. या योजनेचे पंतप्रधानांसाठी भावनिक महत्त्व आहे. त्यामुळे योजनेसाठी आवश्यक ती सर्व मदत देण्याची तयारी त्यांनी दाखवली. भारताच्या दौ-यावर आलेले वेदरिल म्हणाले की, ऑस्ट्रेलियामध्ये जलसंशोधन क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ आहेत. तसेच आवश्यक त्या सोयीसुविधाही आहेत. त्यामुळे गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी भारताला मी मदत करू इच्छीतो असे ते म्हणाले.