आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Will Meet Pakistan PM In New York, Manmohan Singh Says

भारत-पाक तणावानंतर प्रथमच दोन्ही देशांचे पंतप्रधान भेटणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण बैठकीनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाब शरिफ यांची भेट घेणार आहे, अशी माहिती पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आज (बुधवार) दिली.

गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शस्त्रबंदी मोडून दोन्ही देशांच्या लष्कराचे जवान एकमेकांच्या सीमा चौकींवर तुफान गोळीबार करीत आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी लष्कराने भारतीय भूमित घुसखोरी करून काही भारतीय जवानांची हत्या केली होती. त्यावेळी दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये कमालिचे वितूष्ट निर्माण झाले होते.

न्युयॉर्कला जाण्यापूर्वी मीडियाशी बोलताना पंतप्रधान म्हणाले, की न्युयॉर्कमधील माझ्या दौऱ्यादरम्यान मी बांगलादेश, नेपाळ आणि पाकिस्तानच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय विषयांवर चर्चा करणार आहे. यावेळी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विषयांवर चर्चा घडवून आणली जाईल.