आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Will President House N Parliament Be Displaced Or Govt Pay Rs 15000 Crore Compen

राष्ट्रपती भवन आणि संसद आपल्‍या जाग्‍ाेवरून हटणार ? जमिनीवर शेतकऱ्याचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली – हरियाणातील सोनीपत गावातील सज्जनसिंग हे अल्‍पभूधारक शेतकरी. त्‍यांच्‍याकडे सध्‍या केवळ दोन एकर शेत जमीन आहे. पण, सज्‍जनसिंग हे अचानक चर्चेत आलेत. कारण, सध्‍या मालचा गावाच्‍या ज्‍या 155 एकर जागेवर राष्‍ट्रपती भवन, संसद, उत्‍तरप्रदेश भवन, कर्नाटक भवन, छत्‍तीसगड भवन या भव्‍य वास्‍तूशिवाय मौर्या शेरेटन आणि ताज महल सारखे पंचतारांकित हॉटेल आहेत त्‍या जमिनीवर त्‍यांनी दावा केला आहे. या जमिनीची मालकी आपल्‍याला मिळावी किंवा बाजार भावाप्रमाणे तिचे 15 हजार कोटी रुपये द्यावे, अशी मागणीही सज्‍जनसिंग यांनी केली आहे. या बाबत त्‍यांनी अडीच महिन्‍यापूर्वी दिल्लीच्‍या उच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली आहे.
वर्ष 2013 च्‍या भूमिअधिग्रहण कायद्यानुसारच्‍या कलम 24(2) नुसार ज्‍या शेतक-याची जमीन शासकीय कामासाठी संपादित करण्‍यात आली आहे त्‍या शेतक-याला पाच वर्षांच्‍या आत बाजार भावाप्रमाणे तिचा मोबदला देणे बंधनकारक आहे. तसे केले नाही तर संबंधित शेतक-याला त्‍याची जमीन परत देण्‍याची तरतूदही आहे. त्‍यामुळे आपल्‍याला 15 हजार कोटी रुपये मिळतील, अशी खात्री सज्‍जनसिंग यांना आहे.
पुढील स्‍नाइडवर वाचा - न्‍यायालयाने दिली केंद्र आणि दिल्‍ली सरकारला नोटिस...