आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Will Pressurise Govt To Resolve 'one Rank One Pension' Scheme Soon: Rahul Gandhi

'वन रँक वन पेन्शन' प्रकरणी सरकारवर दबाव वाढवू : राहुल गांधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लष्करात वन रँक वन पेन्शन योजना लागू न करण्यावरून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला घेरले आहे. सरकारला आश्वासनांचा विसर पडला आहे. परंतु आम्ही त्याच्या अंमलबजावणीसाठी सरकारवर दबाव वाढवू, असा विश्वास त्यांनी माजी सैनिकांना दिला आहे.

शनिवारी काँग्रेस मुख्यालयात माजी सैनिकांच्या प्रतिनिधींशी त्यांची चर्चा झाली. सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीनंतर राहुल म्हणाले, यूपीए सरकारने यावर निर्णय घेतला होता. त्यासाठी निधीचीदेखील तरतूद केली होती. परंतु नवीन सरकार येऊन एक वर्ष झाल्यानंतरही योजनेची अंमलबजावणी झालेली नाही. माजी संरक्षण राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले, हे सरकार सैनिकविरोधी आहे. योजनेतील काही तरतुदींनी दर्जा खालावण्याचा सरकारचा डाव आहे. अपंग, विधवांनाही त्याचा फायदा व्हावा, अशी तरतूद आम्ही केली होती.

काय आहे योजना?
वन रँक वन पेंशन अंतर्गत संरक्षण दलासमान रँकमधून निवृत्त सैनिकांना एकसमान निवृत्तीवेतन देण्याची मागणी करण्यात आली आहे. निवृत्तीच्या तारखा भलेही वेगवेगळ्या असल्या तरीही हा नियम लागू करावा, असे माजी सैनिकांचे म्हणणे आहे. सप्टेंबर २०१३ मध्ये नरेंद्र मोदी यांची भाजपकडून पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाली होती. त्यानंतर पहिल्या जाहीर सभेत त्यांनी ही योजना तत्काळ कार्यान्वित केली जाईल, असे आश्वासन दिले होते.