आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'आदर्श\' निकाली लावूच, इतरांकडेही माध्‍यमांनी लक्ष द्यावे- सोनिया गांधींची भूमिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- 'आदर्श'प्रकरणाचा मुद्दा लवकरच सोडविण्‍यात येईल. परंतु, माध्‍यमांनी कॉंग्रेसची सत्ता नसलेल्‍या राज्‍यांमध्‍ये होत असलेल्‍या भ्रष्‍टाचाराकडेही लक्ष दिले पाहिजे, असे कॉंग्रेसच्‍या अध्‍यक्ष सोनिया गांधी म्‍हणाल्‍या. कॉंग्रेसच्‍या स्‍थापना दिनानिमित्त पक्षाच्‍या मुख्‍यालयात आयोजित कार्यक्रमात पत्रकारांसोबत बोलताना त्‍यांनी ही भूमिका मांडली.

त्‍या म्‍हणाल्‍या, आदर्शच्‍या मुद्यावर पक्षात चर्चा झाली आहे. हा मुद्दा सोडविण्‍यात येईल. भ्रष्‍टाचार आणि महागाई हे दोन प्रमुख मुद्दे आमच्‍यापुढे आहेत. मोठी आव्‍हाने आमच्‍यापुढे आहेत. परंतु, आम्‍ही एकत्र येऊन लढू आणि जिंकू, असे सोनिया गांधी म्‍हणाल्‍या. माध्‍यमांवर नाराजी व्‍यक्त करताना त्‍या म्‍हणाल्‍या, विरोधकांची सत्ता असलेल्‍या इतर राज्‍यातही भ्रष्‍टाचार होत आहे. माध्‍यमांनी त्‍याकडेही लक्ष दिले पाहिजे. आमच्‍याकडे लक्ष ठेवा. चुका दाखवा. परंतु, इतरांकडेही पाहिले पाहिजे.

राहुल गांधी यांनी राज्यातील कॉंग्रेस आघाडी सरकारचा आदर्शचा अहवाल फेटाळण्याच्‍या निर्णयावर टीका केली होती. अहवाल फेटाळण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्‍यानंतर सोनिया गांधींनी पक्षाच्‍या स्‍थापना दिनाला हा मुद्दा मांडल्‍यामुळे विशेष म्‍हत्त्व प्राप्‍त झाले आहे.