नवी दिल्ली - मध्य प्रदेश येथील उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीने, अतिरिक्त जिल्हा व सत्र महिला न्यायाधीशाचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण सोमवारी समोर आले. महिला न्यायाधीशाने या संदर्भात गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.
या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिले. आरोप सिद्ध झाल्यास आरोपी न्यायमूर्तीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही प्रसाद यांनी सांगितले. ही घटना घृणास्पद असल्याचे ते म्हणाले.