आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Windows 10 Available As A Free Upgrade On July 29

एका आवाजात फोन लागेल, संदेशही जाणार !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओरलँडो परिषदेत नाडेला. - Divya Marathi
ओरलँडो परिषदेत नाडेला.
नवी दिल्ली/ओरलँडो - मायक्रोसॉफ्टने आपल्या लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टम विंडोजचे नवे व्हर्जन "विंडोज १०' लाँच करत आहे. २९ जुलै रोजी १३ देशांमध्ये लाँच केले जाईल. यामध्ये भारताचाही समावेश आहे. सध्या त्यांची विंडोज ८.१ ऑपरेटिंग सिस्टिम आहे. विंडोज ७,८,८.१ असणाऱ्या जुन्या ग्राहकांना काही दिवसापर्यंत मोफत अपग्रेड सुविधा मिळू शकेल.

विंडोज १० मध्ये कोर्टानासह वेब ब्राऊझर आहे. त्याची स्पर्धा अॅपलच्या सीरीशी आहे. यामध्ये एमएस एज, एक्सबॉक्स अॅपसारख्या नव्या गोष्टी आहेत. मायक्रोसॉफ्टच्या म्हणण्यानुसार सिस्टिम जास्त वेगवान,सुरक्षित आणि कंपॅटिबल आहे. याचा वापर पीसी, टॅबलेट, स्मार्टफोन आणि अन्य दुसऱ्या गॅझेटच्या रुपात केला जाऊ शकतो. यामध्ये ऑटोमेटिक अपग्रेडची सुविधा आहे.

नवी दिल्ली, न्यूयॉर्क, सालो पावलो,लंडन,माद्रिद,जोहान्सबर्ग, बर्लिन, नैरोबी, दुबई, बीजिंग, सिंगापूर, टोकियो आणि सिडनीमध्ये त्याचे एकाचवेळी लाँचिंग होणार आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला म्हणाले, विंडोज १० फोन आणि टॅबलेटपासून पारदर्शी कॉम्प्युटर होलोलेन्सपर्यंत प्रत्येक वस्तूवर ते चालेल. त्याचा सहजतेने वापर करता येऊ शकेल. लोक त्याच्याशी बोलू शकतील, हात लावू शकतील.
घालता येऊ शकणारा संगणक
क्लाइड टेक्नॉलॉजीसंदर्भात नाडेला म्हणाले, यूजरची ओळख पटवणारे सेंन्सर्स यामध्ये असतील. पोशाखासारखे घालता येऊ शकणारे,हात लावता येऊ शकणारे संगणक असतील. कंपनी आगामी दिवसांत पर्सनल कॉम्प्युटिंग, प्रोडक्टिव्हिटी, बिझनेस प्रोसेस आणि क्लाउड प्लॅटफॉर्मवर लक्ष केंद्रीत करेल. नाडेला कंपनीचे भागीदार, वरिष्ठ अधिकारी, तंत्रज्ञान तज्ज्ञ आणि विश्लेषकांसमोर बोलत होते. परिषदेत जवळपास १२,००० लोक उपस्थित होते.
असेही फायदे
मायक्रोसॉफ्टचे एक अॅप आहे त्यात आपल्या आवाजाने कोणालाही फोन लावता येतो व संदेशही पाठवता येऊ शकतो. नेटवर अॅप सर्च करू शकता. रिमांडर, ऑटोमेटिक रिप्लाई, आपले लोकेशन पाहणे, हवामान बदलाची माहिती यासारख्या माहितीसाठीही उपयोग होऊ शकतो.