आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Obama India Visit News In Marathi Wing Commander Puja Thakur Leads The Guard Of Honour In Obama Visit

\'गार्ड ऑफ ऑनर\' देऊन विंग कमांडर पूजा ठाकूर यांनी रचला इतिहास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तीन दिवसीय भारत दौ-यावर असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना राष्ट्रपती भवनात गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला आहे. लष्करी पथकाचे नेतृत्व करणा-या विंग कमांडर पूजा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पथकाने ओबामांना गार्ड ऑफ ऑनर दिला.
एका महिला कमांडरचा नेतृत्वाखाली एखाद्या देशाच्या अध्यक्षांना गार्ड ऑफ ऑनर देण्याची भारतातील ही पहिलीच वेळ असल्याने सर्वाचे लक्ष कमांडर पूजा ठाकूर यांच्याकडे होते. एका महिला कमांडरच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेली गार्ड ऑफ ऑनरची ही पहिलीच वेळ असल्याने या घटनेने इतिहास रचला गेला आहे.
दरम्यान, राष्ट्रपती भवनात ओबामांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे 21 तोफांची सलामी देवून स्वागत करण्यात आले. यानंतर विंग कमांडर पूजा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.