आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली विमानतळावर इथोपियन एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये गुंतले AI विमानाचे विंग्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इथोपियन एअरलाइन्स आणि एअर इंडियाचे विमान एकमेकांना धडकत होते. - Divya Marathi
इथोपियन एअरलाइन्स आणि एअर इंडियाचे विमान एकमेकांना धडकत होते.
नवी दिल्ली - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) एक मोठी दुर्घटनात होता-होता वाचली आहे. इथोपियन एअरलाइन्स आणि एअर इंडियाचे विमान एकमेकांना धडकत होते. दोन्ही विमानांचे पाते एकमेकांमध्ये अडकले होते. ही घटना मंगळवारची असल्याचे सांगतिले जात आहे. डीजीसीएने तपासाचे आदेश दिले आहेत. दिल्ली विमानतळावर तीन महिन्यातील अशा प्रकारची ही तिसरी घटना आहे. मेमध्ये जेट एअरवेजच्या विमानाचे विंग दुसऱ्या विमानाला लागले होते. 
 
एप्रिलमध्ये तीन घटना टळल्या... 
- दिल्ली विमानतळावर एप्रिल मध्ये अशाच प्रकारच्या तीन घटना टळल्या आहेत. दोन विमान आमने-सामने येणे, पक्षी विमानाला धडकणे आणि हायड्रोलिक बिघाडाची ही तीन प्रकरणे होती.
 
2016 मध्ये मोठी दुर्घटना टळली 
- गेल्या वर्षी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी दुर्घटना टळली होती. इंडिगो फ्लाइट आणि स्पाइसजेट एअरवेजचे विमान एकमेकांसमोर आले होते. इंडिगोचे विमान लखनऊवरुन येत होते. त्याचवेळी दिल्ली-हैदराबाद स्पाइसजेटचे फ्लाइट टेकऑफ करणार होते. तेव्हाच रनवेवर ही दुर्घटना होता होता राहिली. 
- दोन्ही विमानांनी दावा केला होता की ते एटीसी इन्स्ट्रक्शन्सनुसार पुढे निघाले होते. त्यांनी सांगितले की एटीसी आणि पायलट्स दरम्यान चुकीचे इन्स्ट्रक्शन दिल्या गेले त्यामुळे ही घटना घडली होती. 
बातम्या आणखी आहेत...