नवी दिल्ली/मुंबई/जयपूर/अहमदाबाद/चंदिगड - गेल्या वर्षी देशभर पडलेल्या कडाक्याच्या थंडीची यंदाही तुम्हाला धास्ती असेल तर घाबरण्याचे कारण नाही. या हिवाळ्यात देशात नोव्हेंबर ते जानेवारी २०१५ या काळात पारा सरासरीपेक्षा ते अंश अिधकच राहील. फक्त पूर्व उत्तर प्रदेश बिहार याला अपवाद राहील. येथे तापमान ते अंशाने सरासरीपेक्षा उतरू शकते. स्कायमेट या खासगी वेधशाळेने हा अंदाज वर्तवला आहे. संस्थेचे प्रमुख असलेले शास्त्रज्ञ महेश पलापत यांच्यानुसार उपग्रहांद्वारे मिळालेल्या छायाचित्रांच्या आधारे हा अंदाज बांधण्यात आला आहे. यंदा मान्सून २० % कमी होता. थंडी यामुळेच कमी होईल, असे मानले जाते.
कर्नालमधील ओआयसी मेटरॉलॉजीचे डॉ. जी. एस. बुंदेला यांच्यानुसार यंदा थंडी २०१२ नंतर प्रथमच सरासरीइतकी राहील. तेव्हा ही सरासरी १२ ते १४ अंश होती. २००९-११ दरम्यान थंडी सामान्य होती. पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेशातील बहुतांश भागांत यंदा सरासरी कमाल तापमान २५ अंश तर किमान तापमान १२ अंश सेल्सियस नोंदले जाईल. याशिवाय मध्य प्रदेश, छत्तीसगड आिण महाराष्ट्रात थंडी सरासरीइतकीच राहील. पलापत यांच्यानुसार उत्तर प्रदेश बिहारमध्ये जानेवारीमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पारा घसरेल. झारखंडमध्ये थंडीची चाहूल अपेक्षेपेक्षा लवकर आहे. दरवर्षी नोव्हेंबरमध्ये येथे कडाक्याची थंडी असते. यंदा १५ ऑक्टोबरपासूनच थंडी सुरू झाली आहे.
परदेशी संस्थांचाही हाच अंदाज
आर्क्टिकहून दक्षिणेकडे वाहणार्या थंड वार्यांचा भारतावर परिणाम होईल का, याबाबत परदेशी संस्थांनी नकारात्मक अंदाज वर्तवला आहे. जपानची जेम्स्टेक सीएफएस-२ या संस्थांच्या मते डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान संपूर्ण देशात तापमान ०.६ ते ०.९ अंशाने अधिक असेल. सीएफएस-२च्या मते यंदा सरासरीइतकीच थंडी राहील. नागपूरचे अक्षय देवरा यांच्या मते अमेरिका युरोपातील उंचावरील देशांमध्येच या वार्यांचा परिणाम होत असतो. भारतीय उपखंड सखल भागात मोडला जातो.
औरंगाबादेत थंडी किंचित वाढणार : औरंगाबाद,बीड आणि अहमदनगर जिल्ह्यांत पारा सरासरीपेक्षा १ ते २ अंश उतरू शकतो. सध्या तरी महाराष्ट्रात अद्याप थंडीचा कडाका जाणवलेला नाही. उलट बहुतांश भागांत दिवसा उन्हामुळे तापमानात वाढ जाणवत आहे. हे तापमान ३१ ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत आहे.