आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

BJP MPs-MLAs-मंत्र्यांनी 8 नोव्हेंबरनंतर केलेल्या बँक व्यवहाराचे डिटेल्स द्यावे- PM मोदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदींनी पक्षाच्या MP\'s आणि MLA\'s यांचे बँक डिटेल्स मागवले आहे. - Divya Marathi
मोदींनी पक्षाच्या MP\'s आणि MLA\'s यांचे बँक डिटेल्स मागवले आहे.
नवी दिल्ली - 8 नोव्हेंबरच्या नोटबंदीनंतर पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या बँक खात्यात काय व्यवहार झाले याची माहिती पक्षाध्यक्षांना देण्याचा आदेश पंतप्रधान मोदींनी दिले आहे. नरेंद्र मोदींनी भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि आमदारांना त्यांच्या बँक खात्यांचे विवरण मागितले आहे. पंतप्रधानांनी संसदीय पक्षाच्या बैठकीत सांगितले, की भाजपच्या सर्व लोकप्रतिनिधींनी ८ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत त्यांच्या खात्यातून झालेल्या देवाण-घावाणीचे विवरण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना द्यावे. ही माहिती १ जानेवारीपर्यंत देण्याचे पंतप्रधानांनी सांगितले आहे. दुसरीकडे मंगळवारीही गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज ठप्प झाले. ११ वाजता संसदेच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांनी गदारोळ केला. त्यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज एक तासांसाठी स्थिगत करण्यात आले.

संसदीय कार्य राज्यमंत्री अनंतकुमार म्हणाले, 'पक्षाच्या बैठकीत पंतप्रधानांनी सर्व नेत्यांना सांगितले, की आमचा लढा काळ्या पैशांविरोधात आहे. प्राप्तीकरात होणारे संशोधन गरीबांच्या फायद्याचे असणार आहे.'
- संसदेच्या हिवाळी आधिवेशनाला १६ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली होती, तेव्हापासून आतापर्यंत एकही दिवस सभागृहाचे कामकाज सुरळीत चालेले नाही.
- नोटबंदीवरुन विरोधकांनी दोन्ही सभागृहात गदारोळ घातला आहे.
- विरोधकांनी नोटबंदीवर चर्चेची मागणी केली होती. राज्यसभेत चर्चेला सुरुवातही झाली मात्र, विरोधक पंतप्रधानांच्या उपस्थितीतवर अडून बसले.
- गेल्या आठवड्यात पंतप्रधान एक तासांसाठी सभागृहात आले होते. मात्र विरोधकांची मागणी आहे की संपूर्ण चर्चेवेळी ते सभागृहात उपस्थित असले पाहिजे.
- दुसरीकडे, लोकसभेत विरोधकांची मागणी आहे की चर्चा मतदानाच्या नियमांतर्गत झाली पाहिजे.
- सरकारचे म्हणणे आहे, की कोणत्याही अटी-शर्थींशिवाय चर्चा झाली पाहिजे.
- अर्थमंत्री अरुण जेटलींनी म्हटले आहे की पंतप्रधान या मुद्द्यावर राज्यसभेत उत्तर देतील.
बातम्या आणखी आहेत...