आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसदेच्या ठप्प कामकाजावर अडवाणी नाराज, म्हणाले- सत्ताधारी-विरोधक दोघे असमर्थ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील आठवड्यात मोदी राज्यसभेत उपस्थित होते. मात्र तास-दिडतासानंतर ते निघून गेले त परत आले नाही. यामुळे राज्यसभेतील नोटबंदीवरील चर्चा पूर्ण होऊ शकली नाही. - Divya Marathi
मागील आठवड्यात मोदी राज्यसभेत उपस्थित होते. मात्र तास-दिडतासानंतर ते निघून गेले त परत आले नाही. यामुळे राज्यसभेतील नोटबंदीवरील चर्चा पूर्ण होऊ शकली नाही.
नवी दिल्ली - संसदेच्या यंदाच्या हिवाळी अधिवेशनाचे एकही दिवस कामकाज पूर्ण झालेले नाही. नोटबंदीवरुन विरोधक रोज गदारोळ घालत असल्याचे चित्र आहे. बुधवारी संसदेच्या कामकाजाला गोंधळातच सुरुवात झाली. लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. दरम्यान, लालकृष्ण अडवाणी केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांना म्हणाले, सरकार आणि विरोधक दोन्ही पक्ष संसद चालवण्यात असमर्थ ठरले आहेत.
- राज्यसभेत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आक्रमक होते. ते म्हणाले, 'देशाला रांगेत उभे करण्यात आले आहे. 84 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. याची जबाबदारी कोण घेणार आहे?' प्रत्युत्तरात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले, हिंमत असेल तर विरोधकांनी चर्चा करावी. घोषणाबाजी आणि गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी 12 वाजतापर्यंत स्थगित करण्यात आले. लोकसभेत विरोधी पक्षाने नियम 184 नुसार चर्चेची मागणी लावून धरली आहे. सरकार मतदानाच्या नियमानुसार चर्चेला तयार नाही. दरम्यान आज मोदी संसदेत उत्तर देण्याची शक्यता आहे.

पूर्ण पैसा येणार होता तर ब्लॅकमनी कुठे गेला ?
- गुलामनबी आझाद म्हणाले, महसुल सचिव म्हणाले होते, जेवढा पैसा आहे तो सगळा परत येईल. पूर्ण पैसे परत येणार होते तर ब्लॅकमनी कुठे गेला ?
- संपूर्ण देशाला रांगेत उभे करण्यात आले आहे. रांगेत उभे राहावे लागत असल्यामुळे लाखो लोकांचा रोजगार बुडाला आहे. 84 जणांचा मृत्यू झाला. याला जबाबदार कोण आहे?
- महसूल सचिव डॉ. हसमूख अढिया म्हणाले होते, सरकारला आपेक्षा आहे की बंद झालेल्या 500-1000 च्या नोटा बँकिंग सिस्टिमध्ये येतील. काळापैसा जमा करणाऱ्यांना सोडले जाणार नाही.
'कॅशलेसचा देशभर प्रचार करा'
भाजपच्या संसदीय मंडळाची बुधवारी सकाळी बैठक झाली. त्यात नरेंद्र मोदी म्हणाले, 'निवडणूक काळात ईव्हीएम मशिनबद्दल ज्या पद्धतीने प्रचार केला जातो तसाच प्रचार कॅशलेस सिस्टिमचा झाला पाहिजे.' संसदीय कार्य राज्यमंत्री अनंतकुमार म्हणाले, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत नोटबंदीवर निवदेन करु शकतात.

काय म्हणाले जेटली
- विरोधकांच्या हल्ल्यांना आज राज्यसभेत अरुण जेटलींनी उत्तर दिले. ते म्हणाले, नोटबंदीवर चर्चा सुरु झाली होती. विरोधकांनी मागणी केली होती की पंतप्रधान चर्चेला उपस्थित पाहिजे तर ते सभागृहात आले होते.
- मात्र विरोधाकांना चर्चा करण्याचीच इच्छा नाही. विरोधक शुन्य प्रहरात फक्त टीव्ही कव्हरेजसाठी नोटबंदीचा मुद्दा उपस्थित करतात.
- जेटली म्हणाले, एकच मुद्दा वारंवार शुन्य प्रहरात का उपस्थित केला जात आहे ? यावर विरोधकांनी घोषणाबाजी केली.
- जेटली म्हणाले, विरोधकांमध्ये हिंमत असले तर त्यांनी चर्चा करावी.
राज्यसभेचे कामकाज दुपारपर्यंत स्थगित
राज्यसभेच्या कामकाजाला नित्याप्रमाणे गोंधळात सुरुवात झाली. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी नोटबंदीमुळे देशातील गोरगरीबांची रोजी-रोटी बंद झाल्याचा प्रश्न उपस्थित केला.
बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी नोटबंदीतून काळापैसा बाहेर येईल असे सांगण्यात आले मात्र देशातील खालच्या स्तरावर याचा अतिशय वाईट परिणाम होत आहे. त्यांचे रोजगार जाण्याची वेळ आली असल्याचे म्हटले.
राज्यसभेत गोंधळ वाढल्यानंतर सभापतींनी कामकाज दुपारी 12 वाजतापर्यंत स्थगित केले. त्यानंतर सुरु झालेले कामकाज अवघे पाच मिनिट चालेले आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी 2 पर्यंत स्थगित करण्यात आले. विरोधक 'चर्चा करो',च्या घोषणा देत होते.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...