आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटबंदी: राहुल गांधींचा सवाल- PM पॉप कॉन्सर्टमध्ये बोलू शकतात, मग संसदेत चुप्पी का?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधानांनी सभागृहात हजर राहावे अशी  मागणी लोकसभेत विरोधकांनी लावून धरली होती. - Divya Marathi
पंतप्रधानांनी सभागृहात हजर राहावे अशी मागणी लोकसभेत विरोधकांनी लावून धरली होती.
नवी दिल्ली - नोटबंदीवरुन मंगळवारीही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाला. लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित केले गेले, तर राज्यसभेचे कामकाजही अनेकवेळा स्थगित झाले. दरम्यान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी सवाल केला, की पंतप्रधान टीव्ही आणि लाइव्ह कॉन्सर्टमध्ये भाषण देऊ शकतात तर संसदेत बोलायला काय होते ? सोमवारपासून विरोधकांनी पंतप्रधानांनी सभागृहात निवेदन करावे, अशी मागणी केली आहे. संसदेचे कामकाज सुरु होण्यापूर्वी भाजप संसदीय मंडळाची बैठक झाली, त्यात पंतप्रधान मोदीही उपस्थित होते.
'PM पॉप कॉन्सर्टमध्ये बोलतात मग संसदेत का नाही ?'
- काँग्रेस नेते सुरजेवाला म्हणाले, नोटबंदीमुळे 13 दिवसांत 70 लोकांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाची पंतप्रधान माफी मागणार आहेत की नाही ?
- संसद परिसरात राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान टीव्ही आणि पॉप सिंगरच्या कॉन्सर्टमध्ये हजेरी लावून भाषण करु शकतात, मग संसदेमध्येच का बोलत नाहीत?
- काँग्रेसचे राज्यसभा सदस्य आनंद शर्मा म्हणाले, मोदींनी म्हटले की देशातील 86% चलन हे काळेधन आहे, हे वक्तव्य देशाचा अपमान करणारे आहे. यानंतर राज्यसभेत गदारोळ झाला.
- पंतप्रधानांनी सभागृहात हजर राहावे अशी मागणी लोकसभेत विरोधकांनी लावून धरली होती.
- दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी 12 वाजतापर्यंत स्थगित करण्यात आले.
जेटली म्हणाले- नोटबंदी देशहितासाठी
- भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत अर्थमंत्री जेटली म्हणाले, 'नोटबंदीचा निर्णय ऐतिहासिक आहे. यामुळे गरीबी कमी करण्यास मदत होणार आहे. हा निर्णय देशहितासाठीचा आहे.'
- चलनतुटवड्यावर जेटली म्हणाले, '500-1000 च्या नोटांचा चलनात 86% वाटा होता. यावरुन तुम्हाला लक्षात येईल की हा निर्णय किती मोठा होता. विचार करा, सव्वा लाख बँका, पोस्ट ऑफिस आणि एटीएममध्ये नवीन नोटा पोहोचवण्यात किती अडचणी असतील. एक एटीएम रिकॅलिबरेट करण्यासाठी साडेचार तास लागतात. त्यामुळे देशातील सर्व एटीएम बदलण्यास वेळ लागणार आहे.'
बातम्या आणखी आहेत...