आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटबंदी : 500 रुपयांच्या जुन्या नोटा देऊन बियाणे खरेदीची शेतकऱ्यांना मुभा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नोटबंदीनंतर अनेक अफवा आणि वावड्या उठत आहे. 10 रुपयांचे नाणे बनावट असल्याचा अपप्रचार करुन ते घेण्यास नकार मिळत असल्याचे कळाल्यानंतर रिझर्व्ह बँक
ऑफ इंडियाने स्पष्टीकरण दिले आहे. 'काही लोक जाणिवपूर्वक 10 रुपयांच्या नाण्याच्या सत्यतेवर प्रश्न उपस्थित करीत आहे. सामान्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. 10 रुपयांचे नाणे चलनात कायम असून, कोणतीही शंका मनात न ठेवता त्याचा वापर करावा.' दुसरीकडे केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या बीज खरेदीवर मलमपट्टीचा विचार केला आहे. 500 रुपयांच्या जुन्या नोटा देऊन शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करता येणार आहेत. मात्र ही खरेदी फक्त सरकारी मंडळाकडून करता येणार आहे.

- RBI ने नागरिकांना अवाहन केले आहे, की 10 रुपयांचे नाणे स्वीकारले जावे. कारण ते कायदेशीर आहे.
- 10 रुपयांचे नाणे बऱ्याच वर्षांपासून चलनात आहे. त्यामुळे वेगवेगळे डिझाइन आणि आकारांमध्ये ते उपलब्ध असणे सहाजिक आहे. मात्र 10 रुपयांचे कोणतेही नाणे बाद झालेले नाही.
- आरबीआयचे म्हणणे आहे की अफवांमुळे दुकानदार, व्यापारी हे नाणे घेण्यास नकार देत आहेत. मात्र या अफवांवर विश्वास ठेवू नये.
- आरबीआयच्या म्हणण्यानुसार, नाण्यावर रुपयाचा सिंबॉल असलेली नाणी आणि सिंबॉल नसलेली नाणी दोन्ही उपलब्ध आहेत. यातील कोणतेही नाणे बनावट नाही. त्यामुळे ते बिनधास्त वापरता घेतले जावे.
पुढील स्लाइडमध्ये, नोटबंदीवरुन संसदेत गदारोळ
बातम्या आणखी आहेत...