आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Winter Session Of Parliament Will Begin On Thursday

जीएसटी मंजुरीसाठी सरकार विरोधी पक्षांच्या संपर्कात : व्यंकया नायडू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जीएसटी विधेयक मंजूर करून घेण्यासाठी सरकार विरोधी पक्षाच्या संपर्कात असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री व्यंकया नायडू यांनी सोमवारी दिली. जीएसटी विधेयक ही काळाची गरज असल्याचे सांगत हिवाळी अधिवेशनात याला मंजुरी मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व पक्षांनी राजकीय विचारात न अडकता देशाच्या हिताचा विचार करावा, असा सल्ला नायडू यांनी दिला. अशा अनेक समस्या आहेत, ज्यावर आपण भांडू शकतो. मात्र, जीएसटी गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.

संसदीय प्रकरणाचा मंत्री या नात्याने जीएसटी विधेयक मंजूर होईल, असा मला पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात आम्ही सर्व विरोधी पक्षांशी चर्चा करत आहोत. त्यांनी आम्हाला काही सूचना केल्या असून सरकारने त्या स्वीकारण्याची तयारीही दाखवली आहे. त्यावर संसदेत सविस्तर चर्चा केली जाऊ शकते. एक एप्रिल २०१६ पासून वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मध्ये राज्यांचे अनेक कर समाविष्ट केल्यानंतर देशात एकच कर लागू होणे अपेक्षित आहे. तसे झाल्यास आिर्थक विकासाला चालना मिळेल.
मात्र, जर हिवाळी अधिवेशनात ते मंजूर झाले नाही तर त्या तारखेला ते लागू होणे शक्य नाही. जीएसटी लाेकसभेत मंजूर झाले असून त्याला राज्यसभेत मंजुरी मिळणे आवश्यक आहे, येथे एनडीएला बहुमत नाही. काँग्रेसने त्याला मंजुरी देण्यास विरोध केला आहे. या विधेयकामध्ये काही नवीन तरतुदी समाविष्ट करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
जीएसटी भारतासाठी चांगली संधी
नायडू म्हणाले, जीएसटीची लागू झाल्यास झाल्यास देशाचा जीडीपी १.५ ते ३ टक्क्यांपर्यंत वाढेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. जागतिक बाजारात सध्या मंदीची स्थिती आहे. चीनची आकडेवारीही नकारात्मक आहे. त्यामुळे ही भारतासाठी चांगली संधी आहे. अर्थव्यवस्था मजबूत होईल.. व्याजदर कमी होऊन लोकांना त्याचा लाभ होईल.