आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wireless Intercepts Indicate Terror Boats Were In Touch With Pakistani Army

\'त्या\' बोटीवरील लोक पाकिस्तान लष्कर व दुस-या बोटीच्या होते संपर्कात!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पाकिस्तानमधून अरबी समुद्रात आलेल्या दोन संशयित बोटीवरील लोक एका व्यक्तीमार्फत पाकिस्तानी लष्कर आणि समुद्री सुरक्षा यंत्रंणाच्या संपर्कात होते हे आता पुढे आले आहे. यातील एका बोटीला एक जानेवारीला पहाटे अरबी समद्रात कोस्ट गार्ड्सने भारताच्या समुद्र हद्दीत रोखले होते. त्यानंतर या बोटीला आग लागल्याने समुद्रात बुडाली होती. दरम्यान, बोटीवर प्रवास करीत असलेल्या लोकांतील बातचित नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गेनाइजेशन (एनटीआरओ) ने टेप केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, ही बातचितची टेप ऐकल्यानंतर बोटीवरील लोक एका व्यक्तीद्वारे पाकिस्तानी लष्कराशी संपर्कात होते. तसेच संबंधित व्यक्ती सतत थायलॅंडमधील कोणाला तरी संपर्क साधत होती.
सूत्राच्या माहितीनुसार, 'पहिली बोट बुडत होती तर दुस-या बोटीवरील लोक बातचित करीत होते. या बातचीतमध्ये दुस-या बोटीवरील लोक काम संपवून परत येऊ असे बोलत असल्याचे टेप झाले आहे. याबाबत अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे की, दोन्ही बोटीवरील लोक समुद्रात हत्यार आणि शस्त्रसाठा यांची देवान-घेवान करीत असावेत. टेप झालेल्या बातचितमधून हे मात्र स्पष्ट होत आहे की, या दोन्ही बोटी कोणते तरी संशयित मिशन पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील होत्या.
कराची येथून भारताच्या दिशेने एक नव्हे तर दोन पाकिस्तानी बोटी चाल करून आल्या होत्या. त्यातील एक बोट संशयित दहशतवाद्यांनी स्फोट घडवून उडवून दिली असली तरी दुसरी बोट पलायन करण्यात सफल झाली अशी धक्कादायक माहिती आता बाहेर आली आहे. थर्टी फर्स्टच्या रात्री पोरबंदरकडे आलेल्या पाकिस्तानी बोटीतील संशयित दहशतवाद्यांचे ‘टार्गेट’ गुजरात होते, तर भारताच्या सागरी सीमेवर धडकलेल्या दुसर्‍या बोटीचा निशाणा मुंबईवर असावा अशी शक्यता तटरक्षक दलातील अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.
पहिली पाकिस्तानी बोट भारतीय तटरक्षक दलाच्या कचाट्यात सापडल्याची चाहूल ‘लश्कर-ए-तोयबा’ला लागल्यानंतर दुसर्‍या बोटीने शिताफीने पुन्हा पाकिस्तानी सागरी सीमा गाठली असे त्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. त्या दोन्ही पाकिस्तानी बोटींनी तटरक्षक दलाला चकवा देण्यासाठी मच्छीमारांना नेहमीचा मार्ग न अवलंबता दीर्घपल्ल्याचा मार्ग निवडला होता. कराचीहून त्या दोन्ही बोटी सरळ निघाल्या होत्या, पण खोल समुद्रात आल्यानंतर त्यांनी मार्ग बदलला. संशयित दहशतवाद्यांच्या दुसर्‍या बोटीने भारताच्या सागरी हद्दीतील मच्छीमारांच्या बोटींमध्ये मिसळण्याचा प्रयत्न केला होता ते हाणून पाडल्याने मोठा अनर्थ टळला आहे.