आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wish Death Petition Heard By Supreme Court Constitutional Bench

इच्छामरण द्यावे किेंवा नाही, सुप्रीम कोर्टाने घटनापीठाकडे प्रकरण सोपवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने इच्छामृत्यू प्रकरणी दाखल एक याचिका घटनापीठाकडे हस्तांतरीत केली आहे. सर न्यायाधीश पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेतील तीन सदस्यांच्या पीठाने हे निर्देश दिले आहेत. ही याचिका मरणासन्न अवस्थेतील अरुणा शानबाग यांच्या वतीने दाखल करण्यात आहे. ही व्यक्ती वैद्यकीयदृष्ट्या बरी होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे डॉक्टरांचे मत आहे.
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश पी. सदाशिवम यांच्या पीठाने प्रकरण हस्तांतरीत करताना म्हटले आहे, की अरुणा शानबाग इच्छामृत्यू प्रकरणी न्यायालयाने यापूर्वी दिलेला निर्णय एका निश्चित प्रक्रियेच्या आधारावर दिला होता, जो स्पष्ट नाही. तीन सदस्यांच्या पीठाने म्हटेल आहे, की हे महत्त्वपूर्ण कायदेशीर प्रकरण आहे, यात कायद्याची संपूर्ण स्पष्टता असणे गरजेचे आहे. त्यासाठी हे प्रकरण घटनापीठाकडे पाठविण्यात येत आहे.
याचिकाकर्त्यांच्या वकीलाने कोर्टाला सांगितले, की त्यांचा अशील 2008 पासून व्याधीग्रस्त असून वैद्यकीय उपकरणांच्या साह्याने जीवंत आहे. अशा पद्धतीने त्याला जीवंत ठेवण्याएवजी मृ्त्यू दिला जाणे योग्य आहे.
केंद्र सरकारचा युक्तीवाद
सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारने याचिकेला विरोध करताना म्हटले आहे, की हे आत्महत्येसमान असून भारतात त्याला परवानगी नाही.
याचिकाकर्त्यांचा यु्क्तीवाद
याचिका एका एनजीओच्या माध्यमातून करण्यात आली असून त्यांनी म्हटले आहे, की डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे, की आजारी व्यक्ती अशा स्थितीत आहे की आता तिची वाचण्याची कोणतीच शक्यता नाही. अशावेळेस त्यांना वैद्यकीय उपकरणांची मदत नाकारण्याचा अधिकार असला पाहिजे.
सुप्रीम कोर्टासमोरी प्रश्न
एका अशा आजाराने ग्रस्त व्यक्ती जो त्रास सहन करु शकत नाही, त्याला वैद्यकीय उपकारणे नाकारण्याची परवानगी द्यावी किंवा नाही, हा गहन प्रश्न सुप्रीम कोर्टासमोर आहे.