आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Wiss Govt Prepares List Of Indians With Suspected Black Money

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काळा पैसा ठेवणार्‍यांची स्विस सरकार देणार नावे, एसआयटीला करणार मदत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - परदेशी बँकांतील काळ्या पैशाविरुद्धच्या लढाईत भारताला पहिले यश मिळण्याची सुचिन्हे आहेत. स्वित्झर्लंड सरकारने अशा संशयित खात्यांची यादी केली असून ही माहिती भारताला दिली जाणार आहे.

काळ्या पैशाचा पर्दाफाश करण्यासाठी भारताने नेमलेल्या एसआयटीला संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन स्विस सरकारने दिले आहे. एका ज्येष्ठ स्विस अधिकार्‍यानुसार, त्या देशातील बँकांत जमा पैशाचा लाभ नेमका कुणाला, याचा तपास सुरू आहे. यात काही भारतीय लोक व कंपन्यांचीही नावे समोर आहेत. काही भारतीयांनी सेवाभावी संस्था, डोमेन्सिलिअरी कंपन्या (परदेशी पैशांवर चालणार्‍या कंपन्या) व अन्य मार्गाने काळा पैसा स्विस बँकांत ठेवला आहे.
स्वीत्झर्लंडमध्ये परदेशी आर्थिक भागिदारीच्या माध्यमातून चालणार्‍या कंपन्यांना डोमेन्सिलिअरी कंपन्या संबोधले जाते. या कंपन्यांत 100 टक्के गुंतवणूक परदेशांतूनच होत असते. या कंपन्या अगदी नगण्य कर भरत असतात.

अजूनही अडचणी...
० भारतीयांचा नेमका किती पैसा आहे याचा आकडा स्वित्झर्लंडने जाहीर केलेला नाही. दोन्ही देशांतील करारात गोपनीयतेची तरतूद असल्याने हा आकडा कळेलच याची शक्यता फारच कमी.
० भारताने एचएसबीसी बँकेतील खात्यांसह त्या देशातून चोरीस गेलेल्या भारतीय खातेदारांच्या यादीविषयी सखोल माहिती स्वित्झर्लंडला मागितली होती. ती माहिती यात नाही.
० एचएसबीसीतील यादी तेथील कर्मचार्‍यानेच चोरली होती. यात बडी नावे असू शकतात. नेमकी ही नावे स्विसकडून मिळणार नाहीत.

नावे स्पष्ट झाली तर काय?: एसआयटी तपासात प्राप्तिकर, आर्थिक गुन्हे विभागाची मदत घेतली जाईल. यापूर्वी केंद्राने जर्मनीच्या बँकेत पैसे ठेवणार्‍या 26 भारतीयांची यादी सुप्रीम कोर्टात दिली होती. यातील 8 जणांविरुद्ध पुरावेच नव्हते. या स्थितीत स्विस यादीबाबत पुरावेही महत्त्वाचे ठरतील.

स्विस बँकांत किती घबाड?
- ताज्या आकडेवारीनुसार स्विस बँकांत भारतीयांच्या काळ्या पैशात 2013 मध्ये 40 टक्के वाढ झाली. ही रक्कम 2.03 अब्ज फ्रँक म्हणजेच 14 हजार कोटी.
- ज्या लोकांनी आपण भारतीय असल्याचे जाहीर केले आहे. त्यांचा हा पैसा असल्याचे स्वित्झर्लंड सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे हा तेथील सरकार हा काळा पैसा असल्याचे मानत नाही.
- असोचेमच्या अंदाजानुसार स्वित्झर्लंड आणि इतर देशांतील बँकांत भारतीयांनी जमा केलेला एकूण काळा पैसा 120 लाख कोटींच्या घरात आहे.

भारत 58 व्या स्थानी
स्विस बँकांतील परदेशी खातेदारांत भारत 58 व्या स्थानी. 283 बँकांत जमा 96 हजार अब्ज रकमेत भारतीयांचा वाटा 0.15 टक्के आहे. यात ब्रिटन (20%) अव्वल स्थानी.