आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • With Eye On China, India Deploys Akash Missiles In Northeast

ड्रॅगनशी लढण्याची तयारी, भारताने चीनी सीमेजवळ तैनात केले आकाश क्षेपणास्त्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चीनकडून भारताला कायम डिवचले जात आहे. भारतीय सीमेत चीनची घुसखोरी आणि नियंत्रण रेषेजवळ सैन्य ताकद वाढवण्याच्या कारवाया दिवसेंदिवस वाढत आहेत. या कारवायांमुळे भारत सतर्क झाला असून कोणत्याही संकटाला तोंड देण्यासाठी भारतानेही सीमेवर आपली ताकद वाढवण्यास सुरवात केली आहे. सीमेवर अत्याधुनिक शस्त्रास्त्र तैनात केले जात आहेत. या योजनेंतर्गत पुर्वोत्तर भागात जमीनीवरुन हवेत मारा करणारे सहा आकाश क्षेपणास्त्र तैनात केले जात आहे.
आकाश क्षेपणास्त्राद्वारे भारत चीनच्या लढाऊ विमान, हेलिकॉप्टर आणि ड्रोन हल्ल्यांना चोख उत्तर देऊ शकेल. याआधी भारतीय वायूसेनेने तेजपूर आणि चबुआ येथे सुखोई-30 एमकेआय विमान सज्ज ठेवले होते. चीनला लागून 4,057 किलोमीटर भारतीय सीमा आहे. येथे चीनच्या कारवाया वाढल्या आहेत. त्यांना चोख उत्तर देण्यासाठीच भारताने सुखोई विमान आणि आकाश क्षेपणास्त्र तैनात करण्याची योजना आखली आहे.
चीनला चोख उत्तर देण्याची तयारी
चीनवर लक्ष्य केंद्रीत करुनच भारताने आपली सैन्य ताकद वाढवण्यास सुरवात केली आहे. या योजनेंतर्गत 5000 किलोमीटर पर्यंत मारा करु शकेल अशा अग्नि-5 इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकासीत केले जात आहे. या क्षेपणास्त्राने चीनला लागून असलेल्या भारतीय हद्दीतून चीनच्या कोणत्याही भागावर हल्ला करता येऊ शकेल. एवढेच नाही, तर चीनच्या कारवाया अशाच सुरु राहिल्या तर त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने 64,678 कोटी रुपये खर्च करुन 'माउंटन स्ट्राइक कॉर्प्स' योजना आखली आहे. यात 90 हजार सैनिक असणार आहेत. हे कॉर्प्स 2018-19 मध्ये तैनात होण्याची शक्यता आहे. याशिवाय चीनला लागून असलेल्या सीमा भागात मुलभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी 26,155 कोटी रुपयांची योजना तयार करण्यात आली आहे.

पुढील स्लाइडमध्ये, आकाश क्षेपणास्त्राची काय आहे ताकद...