आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Within Sixth 100 Terrorist Want To Be, Yasin Bhatkal Say In Investigation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहा महिन्यांत 100 अतिरेकी घडवले,यासीन भटकळचा चौकशीत गौप्यस्फोट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/पाटणा - इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा संस्थापक यासीन भटकळने चौकशीत अनेक गौप्यस्फोट केले आहे. पुणे, दिल्ली, बंगळुरूतील बॉम्बस्फोटांत सहभागाची कबुलीही त्याने दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
त्याने सांगितले की, सहा महिन्यांत आपण 100 पेक्षा अतिरेकी घडवले असून ते आपल्या इशा-यावर काहीही करू शकतात. अतिरेकी कारवाया तर रोजच होत राहतात, त्यात काय नवे? अजून तर काहीही घडलेले नाही. आगे आगे देखो होता है क्या?


दरम्यान, भटकळ व असदुल्ला अतर ऊर्फ हड्डीला शुक्रवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 12 दिवसांसाठी एनआयएच्या ताब्यात दिले आहे.


बाटला हाऊस चकमकीनंतर भटकळ पाकिस्तानात गेला. तेथे तोयबा व आयएसआयने त्याला प्रशिक्षण दिले. आयएसआयच्या अधिका-यांनी त्याला आर्थिक मदत व भारतात स्फोटांची ब्ल्यू प्रिंट सोपवली. इक्बाल भटकळ दुबईत, तर रियाझ भटकळ पाकिस्तानात असल्याची माहितीही त्याने दिली.


‘तो’ भटकळ नव्हे : अटकेतील व्यक्ती भटकळ नव्हे तर मोहम्मद अहमद असल्याचा दावा बचाव पक्षाचे वकील एम.एस. खान यांनी कोर्टात केला. मात्र एनआयएच्या वकिलांनी मात्र सबळ पुरावे सादर केले.


चौकशीत मिळाली माहिती
० इंडियन मुजाहिदीनमध्ये सुमारे 150 तरुणांची भरती झाली आहे. हे तरुण बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश व राजस्थानातील आहेत.
० आपल्या नेटवर्कसाठी तो आयएसआयकडून दरवर्षी सहा कोटी रुपये घेत होता.
० गुजरात व दिल्ली इंडियन मुजाहिदीनच्या निशाण्यावर आहेत. मात्र एखादा नेता वा ठिकाणाच्या टार्गेटबद्दल माहिती देण्यास नकार.
० तो कोणताही मोबाइल क्रमांक एकदाच वापरत होता. बोलणे झाल्यानंतर तो सिम लांब पल्ल्याच्या वाहनात फेकून देत असते.


सहा महिन्यांपासून होती भटकळवर पाळत
गेल्या सहा महिन्यांपासून यासीन भटकळवर गुप्तचर संस्थांची करडी नजर होती. या काळात तो नेपाळमध्ये होता. त्याने पत्नीस फोन केले, पत्र लिहिले. ईदसाठी कुटुंबाला 1 लाख रुपयेही पाठवले. एनआयएच्या एका अधिका-याने सांगितले की, माहिती देण्याच्या बदल्यात भटकळला त्याच्या आवडीच्या जेवणासह सर्व सुविधा दिल्या जात आहेत.