आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Without Chief Central Vigilance Commission Work Continue, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रमुखांविनाच केंद्रीय दक्षता आयोगचे रहाटगाडे सुरु

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील महत्त्वपूर्ण आयोग म्हणून ओळख असलेले केंद्रीय दक्षता आयोग (सीव्हीसी) आणि केंद्रीय माहिती आयोगाचे (सीआयसी) रहाटगाडे सध्या प्रमुखाविनाच चालत आहे. माजी संरक्षण सचिव आणि आयुक्त प्रदीप कुमार हे रविवारी सेवानिवृत्त झाल्यामुळे केंद्रीय दक्षता आयोगाचे प्रमुखपद सध्या रिक्त झाले आहे.
प्रदीप कुमार यांनी १४ जुलै २०११ मध्ये आयोगाच्या प्रभारीपदाचा कार्यभार स्वीकारला होता. तेव्हापासून आयोग हे केंद्रीय दक्षता आयुक्त आणि दोन दक्षता आयुक्तांच्या भरवशावरच सुरू होते. त्यापैकी एक दक्षता आयुक्त असलेले जे. एम. गर्ग यांचा कार्यकाळ ७ सप्टेंबरला संपुष्टात आला आहे. सूत्रानुसार, माजी आयपीएस अधिकारी राजीव यांचा केंद्रीय दक्षता आयोगाच्या आयुक्तपदासाठी विचार सुरू आहे. दुसरीकडे, माहिती आयोगाचे आयुक्त राजीव माथूर यांचा कार्यकाळ २२ ऑगस्ट रोजी संपुष्टात आल्याने तेव्हापासून हे पद रिक्तच आहे. माथूर यांची माहिती आयोगाच्या आयुक्तपदी २२ मे रोजी नियुक्ती करण्यात आली.