आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Without Environment Permission Not Pick Up Sand, Say National Green Tribul

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पर्यावरण मंजुरीविना वाळू उपसा अवैध, राष्‍ट्रीय हरित लवादाने घातले निर्बंध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आयएएस अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांच्या निलंबनामुळे बेकायदा वाळू उपशाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, या पार्श्वभूमीवर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने (एनजीटी) नदीतून वाळू उपशावर देशभरात निर्बंध घातले आहेत. यामुळे विनापरवाना किंवा पर्यावरण विभागाच्या मंजुरीशिवाय वाळूचा उपसा बेकायदा ठरणार आहे.

एनजीटीने यापूर्वी उत्तर प्रदेशातील गंगा, यमुना, हिंडन, चंबळ, गोमतीसह इतर नद्यांतून वाळू उपशावर निर्बंध घातले होते. परंतु सोमवारी सर्व राज्यांसाठी आदेश काढण्यात आले. लवादाचे न्यायमूर्ती स्वतंतरकुमार यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर ही सुनावणी सुरू होती. पीठाने म्हटले आहे की, नदीतून बेकायदा वाळू उपशामुळे पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे देशभरात एकच निर्देश आवश्यक आहेत. न्या. स्वतंतरकुमार ट्रिब्युनलचे चेअरमनही आहेत.