आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"आयएसआय'शिवाय विक्री करणे ठरेल गुन्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रस्त्याच्या बाजूला बसून विकले जाणारे हेल्मेट, प्रेशर कुकर आणि मिक्सरसहित एकूण 28 वस्तू आयएसआय मार्किंगशिवाय विकणे या वर्षअखेर बंद होईल. अशा पद्धतीने वस्तू विकताना सापडलात, तर ग्राहकाच्या तक्रारीनंतर संबंधित कंपनी सील करण्याबरोबरच वस्तूच्या निर्मात्यालाही शिक्षा भोगावी लागेल. बीआयएसचे सहसंचालक जन. एम.जे. जोसेफ यांनी "दैनिक भास्कर'ला ही माहिती दिली.

काही राज्य सरकारांनी आपल्या राज्यामध्ये हेल्मेटवर आयएसआय मार्क सक्तीचा केला आहे; पण केंद्रीय पातळीवर प्रथमच अशा पद्धतीची बंदी आणण्याच्या हालचाली बीआयएस करत आहे. फक्त हेच नाही तर मोबाइल, पॉवर बँक, पॉवर अ‍ॅडाप्टरसमवेत अन्य १५ वस्तूंचे सेल्फ डिक्लेरेशन मे महिन्यापासून सक्तीचे असेल. म्हणजे विदेशातून येणार्‍या किंवा देशातच ज्या कंपन्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बनवतात त्यांना आपल्या उत्पादनाची तपासणी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत करावी लागेल. डिक्लेरेशन फॉर्म जमा करून प्रत्येक उत्पादनासाठी रजिस्ट्रेशन नंबर बीआयएसकडून घ्यावा लागेल. या उत्पादनात जर काही दोष आढळले, तर संबंधित कारखानदाराला तुरुंगात जावे लागू शकते.

यामुळे चीनमधून ज्या काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू येतात, त्या चांगल्या दर्जाच्या असतील. बनावट आणि अप्रमाणित उत्पादनाबद्दल ग्राहकांना सहजपणे बीआयएसकडे तक्रार करता यावी म्हणून पुढील महिन्यापासून मोबाइल अ‍ॅप आणि टोल फ्री नंबरही उपलब्ध करण्यात येईल. सघ्या ऑनलाइन तक्रारीची व्यवस्था असली तरी अशा तक्रारी करण्याचे प्रमाण कमी आहे.

गेल्या पाच वर्षांत २१७ तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून ग्राहक जागृतीचे ८१४ कार्यक्रम झाले आहेत. पुढील काळात एकूण ९३४ उत्पादनांसाठी मानके तयार करण्यात येतील, त्यापैकी ९२ उत्पादनांवर आयएसआय मार्किंग अनिवार्य आहे. मार्च २०१५ पर्यंत २९ हजार २३५ परवाने जारी करण्यात आले आहेत. कोणत्याही उत्पादनांसाठी मानके तयार करताना लोकांचे आरोग्य, सुरक्षा, उत्पादन वापरणार्‍या लोकांची संख्या आणि पर्यावरणाचा विचार केला जातो.
जोसफ म्हणाले की, भविष्यात कॉर्पोरेट क्षेत्राप्रमाणे सेवा देण्यासाठी तसेच कर्मचारी ठेवण्याची मर्यादा तसेच सीएसआर म्हणजे कंपन्यांची सामाजिक जबाबदारी ही मानकेही आमच्या विचाराधीन आहेत.

आयटी,पर्यटन,शिक्षण, लॉजिस्टिक अँड रिटेल मेनेजमेंट,बँकींग तसेच वित्तीय क्षेत्र या सेवा क्षेत्रांसाठीची मानके आधिक कडक केली जातील. जोसफ म्हणाले की,आता बीआयएसकडे जादा अधिकार नाहीत. पण सुघारित कायद्यानुसार बेकायदेशीर उत्पादने बाजारातून काढून घेण्याची तसेच पाच पट दंड किंवा दोन लाख रूपये दंड यापैकी जे जास्त असेल ते आकरले जाईल. सध्या हा दंड 50 हजार पर्यंत आहे. याशिवाय एक वषारऐवजी दोन वषर् शिक्षा बजावली जाईल. यामुळे ग्राहकांना चांगली उत्पादने मिळू शकतील.

या वस्तू प्रमाणित न केल्यास कंपन्यांना दंड भरावा लागणा
मोबाइल फोन, पॉवर अ‍ॅडॉप्टर, ऑडीओ-व्हिडिओ इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे अ‍ॅडॉप्टर, पोर्टेबल पॉवर बँक, पाच किलो वॉटचे यूपीएस/इन्व्हर्टर, फोटो कॉपी मशीन, सेल-बॅटरी, स्मार्ट कार्ड रीडर्स, एलईडी मॉड्यूल, एलईडी लँप, कॅश रजिस्टर्स, पीओएस, पासपोर्ट रीडर्स वस्तू.

या वस्तू विकण्यास असेल अट
मिक्सर, एलपीजी स्टोव्ह, एलपीजी रबर पाइप, विद्युत मोटारी, प्रेशर कुकर, लेदरच्या वस्तू, हेल्मेट, सायकलचे पार्ट्स - ब्रेक, चेन, गार्ड, अ‍ॅक्सल आदी), एलपीजी आणि विजेवर चालणारे वॉटर हीटर, स्टोव्ह वॉटर हीटर, सेफ्टी फुटवेअर, सीएनजी बल्ब आणि रेग्युलेटर, विजेचे ट्रान्सफॉर्मर, प्लास्टिक फ्लशिंग सिस्टिम, कारखान्यात काम करताना कर्मचार्‍यांना वापरावे लागणारे कपडे, अशी एकूण २८ उत्पादने आयएसआय मार्कशिवाय विकता येणार नाहीत.