आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

400 वर्षांनंतर या राजघराण्याला मिळाली शापातून मुक्ती, वारसाचा झाला जन्म

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - म्हैसूरचे वडियार राजघराणे 4 शतकांपासून एका शापामुळे ग्रस्त होते. स्वत: वडियार राजघराण्याचे मानणे आहे की, एका शापामुळे 400 वर्षांपर्यंत पिच्छा पुरवला. यामुळे त्यांच्या वंशात मूल जन्माला येत नव्हते. तथापि, म्हैसूरचे 27 वे राजे यदुवीर वाडियार यांचे लग्न 27 जून 2016 रोजी डुंगरपूरची राजकुमारी तृषिका सिंह यांच्याशी झाले होते. वडियार राजघराण्याच्या सून तृषिका सिंह यांनी नुकताच एका बाळाला जन्म दिला आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबाची चारशे वर्षांच्या शापातून मुक्ती झाली आहे.

 

हा शाप होता म्हैसूर राजघराण्यावर...
- दिवंगत महाराज श्रीकांतदत्त नरसिंहराज वाडियार आणि राणी प्रमोदा देवी यांना कोणतीही संतान नव्हती. यासाठी राणी प्रमोदा देवींनी आपल्या पतीच्या मोठी बहिणीचा मुलगा यदुवीर यांना दत्तक घेतले आणि वाडियार राजघराण्याचा वारस बनवले.
- हे घराणे राजपरंपरा पुढे नेण्यासाठी 400 वर्षांपासून कुटुंबातील इतर सदस्यांच्या मुलांना दत्तक घेत आले आहे.
- एका माहितीनुसार, 1612 मध्ये दक्षिणेतील सर्वात शक्तिशाली विजयनगर साम्राज्याच्या पतनानंतर वाडियार राजाच्या आदेशाने विजयनगरची धनसंपत्ती लुटण्यात आली होती.
- त्या काळी विजयनगरची तत्कालीन महाराणी अलमेलम्मा पराभवानंतर एकांतवासात होत्या, परंतु त्यांच्याजवळ पुष्कळ सोने, चांदी आणि जडजवाहिर होते.
- वाडियारने महाराणींकडे दूत पाठवून सांगितले की, हे दागिने आता वाडियार साम्राज्याचा भाग आहेत, यामुळे ते देण्यात यावेत.
- अलमेल्माने जेव्हा दागिने द्यायला नकार दिला, तेव्हा शाही लष्कराने बळजबरी खजिन्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला.
- यामुळे दु:खी होऊन अलमेलम्माने कथितरीत्या शाप दिला की, ज्याप्रकारे तुम्ही लोकांनी माझे घर उद्ध्वस्त केले आहे, त्याच प्रकारे तुमचेही राजघराणे संतानविहीन होईल. आणि या वंशाची वेल कधीच वाढणार नाही.
- शाप दिल्यानंतर अलमेलम्माने कावेरी नदीत उडी मारून आत्महत्या केली होती.

 

महालात होते या मूर्तीची पूजा
- आजही महालात या शापापासून वाचण्यासाइी अलमेलम्माची मूर्ती देवीच्या रूपात पूजली जाते. परंतु यामुळे काही खास फरक पडला, असे वाटत नाही.
- राजा वाडियार यांचे एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाला होता. तेव्हा प्रत्येक पिढीनंतर म्हैसूरच्या राजघराण्याला उत्तराधिकारी म्हणून दुसऱ्याला दत्तक घ्यावे लागते.
- राजपरिवारात उत्तराधिकाऱ्याच्या रूपात ज्यालाही दत्तक घेते तो नेहमी कुटुंबातीलच कोणीतरी व्यक्ती असतो.

 

असे झाले होते लग्न..
- म्हैसूरच्या राजाचा लग्नसोहळा 4 दिवस चालला होता.
- लग्नाच्या विधींसाठी 550 फॅमिली गेस्ट बोलावण्यात आले होते.
- या लग्नात फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि अमेरिकेतूनही सेलिब्रिटी, गेस्टस सहभागी झाले होते.
- या रॉयल फॅमिलीने म्हैसूर पॅलेस आणि हॉटेल अंबा विलास पॅलेसलाच विवाहस्थळ बनवले होते.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...