आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच दिल्याने पोलिसाची महिलेला विटेने मारहाण, व्हिडिओ झाला व्हायरल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीत एका महिलेप्रति पोलिसाच्या असंवेदनशील वागणुकीचा प्रकार समोर आला आहे. एका व्हिडिओत वाहतूक पोलिस महिलेस सर्वांसमोर वीट फेकून मारत असल्याचे दिसून आले. या घटनेवरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
व्हिडिओत पोलिस खात्याची बदनामी झाल्याचे पाहून पोलिस आयुक्त बी.एस.बस्सी यांनी झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. यानंतर पोलिसाला अटक निलंबितही करण्यात आले. दिल्लीच्या खान मार्केट भागात हेडकॉन्स्टेबल सतीश चंद्रा तपासणी करत होता. सतीशनुसार, लाल सिग्नल ओलांडणाऱ्या महिलेला पावती फाडण्यास सांगितले होते. मात्र, महिलेच्या म्हणण्यानुसार पावतीऐवजी २०० रुपयांत प्रकरण मिटवून घेण्याचे पोलिसाने सांगितले होते.
लाच देण्यास नकार दिल्यानंतर महिला दुचाकी पुढे दामटू लागली. यावर संतापलेल्या पाेलिसाने स्कुटीवर लाथ मारून पाडली. त्यात महिला आणि मागे बसलेली दोन्ही मुले पडली. त्यावर महिलेने एक दगड चंद्राच्या बाइकवर मारला. यानंतर सतीश चंद्रानेही फेकून मारलेली वीट महिलेच्या पाठीत बसली. महिलेला मारहाण करतानाचे छायचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर दिल्ली पोलिसांवर प्रचंड टीका होत आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा घटनेचा व्हिडिओ....