आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 वर्षीय चिमुरड्यासह ISIS भर्ती होण्यासाठी जाणार्‍या महिलेला अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/पाटणा: ISIS या जहाल दहशतवादी संघटनेशी संबंधित एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. ते म्हणजे, बिहारमधील पाटण्यात राहाणार्‍या एका महिलेला दिल्ली एअरपोर्टवर पोलिसांनी अटक केली आहे. यास्मीन मोहम्मद (28) असे अटक केलेल्या महिलेचे नाव असून ती काबुलला रवाना होण्यासाठी एअरपोर्टवर आली होती. यास्मीन ISIS जॉईन करण्‍यासाठी काबूलला जाणार असल्याचा पोलिसांना संशय आहे. यास्मीनसोबत 5 वर्षीय मुलगा होता.

'त्या' 21 जणांशी कनेक्शन...
केरळमधील 'त्या' 21 संशयितांसोबत यास्मीनचे कनेक्शन असल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी ISIS जॉईन केले होते.

अब्दुल रशीदची पहिली पत्नी?
यास्मीनचा तलाक (घटस्फोट) झाला असून ती ISIS मध्ये केरळच्या 21 जणांना पाठवणारा अब्दुल रशीद याची ती पहिली पत्नी असण्याचा पोलिंना संशय आहे. रशीद सध्या अफगाणिस्तानात असून तो यास्मीनच्या संपर्कात होता. त्यानेच तिचा ब्रेनवॉश केला आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, यास्मीनला रोकले इमीग्रेशनमध्ये...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...