आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत नराधमांचे राज्य, सहकार्‍यांनीच केला महिलेवर सामूहीक बलात्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- देशाची राजराधी असलेल्या नवी दिल्लीत नराधमांनी उच्छाद मांडला आहे. दिल्ली पूर्वमधील मधु विहारमध्ये एका 40 वर्षीय महिलेवर तिच्या सहकार्‍यांनी सामूहिक बलात्कार केल्याचे उघडकीस झाले आहे. नराधमांनी महिलेचे अपहरण करून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर पीडित महिलेला बेशुद्ध अवस्थेत दिलशाद गार्डनमध्ये फेकून देण्यात आले होते. तब्बल चोविस तासांनंतर शुद्धीवर आल्यानंतर पीडित महिलेने पोलिसांना आपबीती कथन केली.

पोलिस सूत्रांनूसार, गुरुवारी संध्याकाळी पीडीत महिलेने दिलेल्या तक्रारीवरून तिच्या सहकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

पीडित महिला येथील जोशी कॉलनीत आपल्या परिवारासोबत राहते. गौतमबुद्धनगरातील कलेक्शन एजेंट ऑफिसमध्ये ती नोकरी आहे. आरोपी रवींद्र, लोकेंद्र, जय सिंग आणि राकेश हे चार जण याच कार्यालयात काम करतात. चौघे बुधवारी पीडित महिलेच्या घरी पोहचले. बाजारात खरेदी करण्याच्या नावाखाली त‍िला कारमध्ये बसवून तिला गुंगीचे औषध पाजले. त्यानंतर एका निमर्नुष्य स्थळी तिला नेऊन तिच्यावर चौघांनी सामूहिक बलात्कार केला.

दरम्यान, पीडित महिलेवर जीटीबी रुग्णालयात उपचार सुरु असून तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्‍ट झाले आहे.