आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गँगरेप नाही, पेड सेक्‍स; दिल्‍लीतील गँगरेपवर आरोपींचे पाेलिसांना उत्‍तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली-  शनिवारी दिल्‍लीमध्‍ये 28 वर्षीय महिलेवर 5 जणांनी सामूहिक बलात्‍कार केल्‍याची घटना उघडकीस आली होती. पीडितेने रविवारी सकाळी 5.30 वाजता बाल्‍कनीमधून उडी घेत नराधमांपासून सूटका करुन घेतली होती. त्‍यानंतर रस्‍त्‍यावरील एका व्‍यक्तिने पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली होती. पोलिसांनी पाचही आरोपींना रविवारी अटक केली. मात्र आरोपींनी आपण महिलेवर गँगरेप केला नसून पेड सेक्‍स केल्‍याचा दावा केला आहे. यामुळे या प्रकरणाला नवीनच वळण मिळाले असून पोलिस सर्व बाजुंनी तपास करीत आहे.  
 
पाचही आरोपी विशीतील आहे. यापैकी तीन नोएडातील कॉल सेंटरमध्‍ये काम करतात तर एकजण इंजिनिअर आहे.  यातील एका आरोपीची महिलेसोबत ओळख असल्‍याचे पोलिसांनी सांगितले आहे.  पाचही आरोपींना न्‍यायालयीन कोठडी सुनावण्‍यात आली आहे. 
 
महिलेने दोनदा बदलले जबाब
- प्रकरणाचा तपास करणाऱ्या वरिष्‍ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'रविवारी सकाळी 5.30 वाजता महिलेने आपला पहिला जबाब नोंदविला. तेव्‍हापासून आतापर्यंत महिलेने दोनदा जबाब  बदलले आहेत. तसेच सुसंगतपणे घटनेची माहितीही महिलेला देता आलेली नाही.' 
- 'आम्‍ही सर्व आरोपींची सविस्‍तर चौकशी करत असून . सर्व शक्‍यता पडताळून पाहत आहाेत.' अशी माहिती पोलिसांनी दिली.  
-  प्रकरणाशी संबंधित सर्व सीसीटीव्‍ही फुटेज आणि कॉल रेकॉर्डस तपासणार असल्‍याचे पोलिसांनी सांगितले आहे. 
 
काय आहे घटना 
- दोन मुलांची आई असलेल्‍या महिलेची शनिवारी संध्‍याकाळी तिच्‍या ओळखीच्‍या व्‍यक्तिशी भेट झाली. व्‍यक्तिकडे कार होती.  त्‍या व्‍यक्तिने महिलेला दिल्‍लीतील पांडवनगरमधील फ्लॅटमध्‍ये चलण्‍यास सांगितले. 
-  पोलिसांनी सांगितले की, 'रस्‍त्‍यामध्‍ये आणखी दोन जण कारमध्‍ये येऊन बसले. तीघेही महिलेला घेऊन फलॅटवर गेले. तिथे आधीच  दोनजण उपस्थित होते.' 
- महिलेने आरोप केला आहे की, 'फ्लॅटमध्‍ये तिला धमकावण्‍यात आले व जबररस्‍तीने दारु पाजण्‍यात आली. त्‍यांनतर एका खोलीमध्‍ये बंद करुन सकाळपर्यंत तिच्‍यावर रेप करण्‍यात आला.' 
- रविवारी सकाळी 5.30 वाजता महिला बाल्‍कनीपर्यंत येण्‍यात यशस्‍वी झाली आणि  तिने बाल्‍कनीतून उडी मारत पळ काढला. 
- त्‍यामुळे महिलेला शारीरीक दुखापतही झाली. दिल्‍लीतील लाल बहादुर शास्‍त्री हॉस्पिटलमध्‍ये महिलेवर उपचार करण्‍यात आले असून डिस्‍चार्ज देण्‍यात आला आहे.  
 
बोलणी फिसकटल्‍याने मारली उडी, आरोपींचे उत्‍तर 
- पोलिसांना दिलेल्‍या जबानीमध्‍ये आरोपींनी सांगितले की, ' ती महिला वेश्‍या व्‍यवसाय करत असल्‍याचे आम्‍हाला माहित होते. शनिवारी रात्री होळीच्‍या पार्टीनिमित्‍त 5,000 रुपये देऊन आम्‍ही तिला फ्लॅटवर बो‍लावले होते. पैशांची बोलणी आधीच ठरली होती. मात्र नंतर पैशासंबंधी वाद उदभवल्‍यानंतर महिलेने उडी मारली.' 
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, पिंक सिनेमा आणि ही घटना... 

 
बातम्या आणखी आहेत...