आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांची आवडती दागिन्यांची स्कीम बंद, हप्त्यांचे पैसे बिनव्याजी परत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ हैदराबाद/ बंगळुरू - हप्त्यावर सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या योजनांमध्ये पैसा गुंतवणा-या लाखो लोकांसमोर मोठे संकट आहे. केंद्राच्या एका निर्णयामुळे बड्या ज्वेलर्सच्या या योजनांवर गंडांतर आले आहे. तनिष्क ज्वेलर्सने तर ग्राहकांना पैसे परत करण्याची योजना जाहीर करून टाकली. त्यात 31 ऑगस्टपूर्वी आतापर्यंत जमा रकमेचे दागिने खरेदी करा, अन्यथा चेकद्वारे पैसे परत घ्या, असे सांगण्यात आले आहे. मिळणारा पैसा बिनव्याजी असेल. अशा अनेक योजनांमध्ये महिलांची मोठी गुंतवणूक आहे. त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.

ग्राहकांची सर्वाधिक गुंतवणूक तनिष्कमध्ये होती. त्यामुळे तनिष्कने सर्वांत आधी भूमिका जाहीर केली. सरकारने 1 एप्रिलला यासंदर्भात नवीन कायदा लागू केला होता. कंपनीला संशय आल्यामुळे त्यांनी 1 मे रोजी कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या अधिका-यांची भेट घेतली. मंत्रालयाने त्यांना लेखी अर्ज करण्यास सांगितले. यानंतर त्यांनी 2 मे रोजी अर्ज दिला. 23 मे रोजी मिळालेल्या उत्तरात नव्या कायद्यानुसार योजनेतील पैसे पब्लिक डिपॉझिटअंतर्गत येतात. त्यामुळे कंपन्या असा लाभ देऊ शकत नाहीत.

जे ग्राहक सध्या आभूषणे खरेदी करू इच्छित नाहीत, त्यांना तनिष्क ज्वेलर्स येत्या ऑगस्टपर्यंत एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम परत करणार असल्याचे सांगण्यात येते. त्यांच्याकडे लोकांच्या पैशापेक्षा तिप्पट अधिक फंड आहे.

स्थिती का ओढवली ?
कंपनी अ‍ॅक्ट 2013 मध्ये सराफांच्या अशा योजनांमध्ये जमा झालेला पैसा पब्लिक डिपॉझिट ठरवण्यात आला आहे.
या कोणतीही फर्म आपल्या निव्वळ संपत्तीच्या 25 टक्क्यांपर्यंतच लोकांकडून पैसे घेऊ शकते.
तनिष्कजवळ दोन योजनांतूनच त्यांच्या नेटवर्थच्या 45 टक्के डिपॉझिट आले होते.
डिपॉझिटवर 12 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला जाऊ शकत नाही.
पीसी ज्वेलर्सची योजना ‘ज्वेल्स फॉर लेस’अंतर्गत 16.67 टक्के परतावा मिळत होता.
कोणतीही ठेव योजना 12 महिन्यांपेक्षा जास्त मोठी असू नये.
गीतांजली ज्वेलर्सच्या शगुन योजनेत 36 महिन्यांपर्यंत (तीन वर्षे) हप्ते जमा करण्याची तरतूद आहे.

ठेवीच्या सुरक्षेसाठी
यावर टायटनच्या ज्वेलरी विभागाचे सीईओ सी. के. वेंकटरमण यांचे मत-
‘आम्ही तर अशा योजना 12 वर्षांपूर्वी सुरू केल्या होत्या. लोकांच्या आगाऊ रकमेच्या स्वरूपात ज्यांच्याकडे हजारो कोटी रुपये आहेत असे अनेक ज्वेलर्स आता अशा योजना चालवत आहेत. सरकारला यात जोखीम वाटते. आम्ही हा सर्व पैसा बँक खात्यात जमा केला असून त्यातील एका पैदेखील व्यवसायात वापर केला जात नाही. सर्वजण याच पद्धतीने योजना चालवत असतील याची शाश्वती नाही.

ग्राहकांची अडचण वेगळीच...
बंगळुरूच्या पद्मा वेंकटेश्वर यांना या स्थितीत काय करावे समजत नाही. नोव्हेंबरमध्ये त्यांच्या मुलीचे लग्न आहे. यासाठी त्या एका प्रसिद्ध ज्वेलर्सच्या योजनेत वर्षभरापासून त्या पैसा गुंतवत होत्या. योजनेचा लाभ टप्प्यात दिसत असतानाच आदेश आला. जमा झालेल्या पैशाचे दागिने घ्या किंवा पैसे परत घेऊन जा, तसेच आहे त्या दागिन्यांमधूनच त्यांना डिझाइन पसंत करण्यास सांगितले आहे.
० ज्वेलर्सनी घातलेल्या नव्या अटीनुसार ग्राहक जमा केलेल्या पैशातून केवळ दागिनेच खरेदी करू शकतात.
० त्यांना पैशाच्या बदल्यात पैसे आणि सोन्याच्या अन्य कोणत्या गुंतवणुकीच्या रूपात परतावा मिळणार नाही.
० दोन वर्षांपासून सराफा व्यवसायात मंदी आहे. अशा स्थितीत बाजारात कोणती नवी डिझाइन किंवा विशिष्ट साठा अस्तित्वात नाही.
० वर्षापेक्षा जास्त कालावधीची योजना 11 महिन्यांची करू इच्छिणा-या ग्राहकांना आता योजनेत जास्त ईएमआय द्यावा लागेल.

बँकांपेक्षा दुप्पट परतावा
तनिष्कने हप्त्याने सोने खरेदी करण्याची योजना पहिल्यांदा सुरू केली. नंतर अनेक योजनांतून बँकेच्या रिकरिंग डिपॉझिटमधून मिळणा-या परताव्यापेक्षा दुप्पट रक्कम मिळू लागली. त्यामुळे या योजना खूप लोकप्रिय झाल्या.

प्रकरणाचे स्वरूप
5 लाख लोक तनिष्कच्या दोन योजनांमध्ये पैसा गुंतवत आहेत. कंपनीला 20% उत्पन्न अशा योजनांतून मिळते.
रु. 1000 कोटी पैसे परत करेल येत्या महिनाअखेरपर्यंत.
० पीसी ज्वेलर्स : योजना ‘ज्वेल्स फॉर लेस’ बंद.
० टीबीझेड : कल्पवृक्ष योजना दहा महिन्यांची केली जाऊ शकते. गोल्ड डिपॉझिट योजना बंद.
०गीतांजली : शगुन योजना नव्या स्वरूपात आणली जात आहे.