आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने युवतीला 30 वेळा भोसकले, 7 दिवसांनी सापडला मृतदेह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने एका 39 वर्षीय पुरुषाने तब्बल 30 वेळा भोसकून मैत्रिणीचा खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी पुरुषाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्घृण खून झालेल्या या 23 वर्षीय युवतीचे नाव बलजित कौर आहे. तिची अनिश नावाच्या पुरुषासोबत मैत्री होती. आग्नेय दिल्लीतील ओखला परिसरात अनिश भाड्याने राहतो. सात दिवसांनी या घरात बलजितचा मृतदेह आढळून आला आहे.
अनिशने खूनाची कबुली दिली आहे. रागाच्या भरात कात्रिने 30 वेळा भोसकून खून केल्याचे त्याने सांगितले आहे.
23 एप्रिल रोजी बलजित अनिशच्या घरी आली होती. यावेळी त्याने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. परंतु, बलजितने हा प्रस्ताव फेटाळून लावला. अनिश वयाने मोठा असल्याने लग्न करू शकत नाही, असे तिने यावेळी सांगितले होते. यावरून अनिश भडकला. त्याने कात्रिने 30 वेळा भोसकून बलजितचा निर्घृण खून केला. त्यानंतर घराला कुलूप लावून निघून गेला.
दोघेही संगम विहारमधील रहिवासी असून गेल्या दोन-तीन महिन्यांपासून एकमेकांना ओळखत होते. मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपनीत बलजित काम करीत होती.
बलजित बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी नोंदविली होती. पोलिसांनी तिच्या मोबाईल फोनचे डिटेल्स तपासल्यानंतर अनिशचे नाव पुढे आले. त्यानंतर अनिशला पकडण्यासाठी शोध मोहिम उघडण्यात आली. अखेर उत्तराखंडमधील हरिद्वार येथून त्याला अटक करण्यात आली.