आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली आयआयटीमध्ये 27 वर्षीय पीएचडीच्या विद्यार्थीनीने घेतला गळफास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंजुला दिल्ली आयआयटीमध्ये पीएच.डी करत होती. - Divya Marathi
मंजुला दिल्ली आयआयटीमध्ये पीएच.डी करत होती.
नवी दिल्ली - 27 वर्षांची पीएचडीची विद्यार्थीनी मंजुला देवक हिने दिल्ली आयआयटी कॅम्पसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दिल्ली आयआयटी कॅम्पसमधील अपार्टमेंटमध्ये पोलिसांना तिचा मृतदेह आढळला. मंजुलाच्या आत्महत्येच्या कारणाचा अद्याप उलगडा झालेला नाही. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 
 
सुसाइड नोट नाही... 
- मीडिया रिपोर्टनुसार अतिरिक्त पोलिस आयुक्त चिन्मय बिस्वाल म्हणाले, मंजुलाचा मृतदेह नालंदा अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी 7.40 वाजता मृतदेह पाहिला. 
- मंजुलाच्या आत्महत्येचे कारण अजून गुलदस्त्यात आहे. मृतदेहाजवळ सुसाइड नोट किंवा इतर काही वस्तू सापडल्या नाही. पोलिस तिच्या मित्र-मैत्रिणींकडे चौकशी करीत आहे. 
 
2013 मध्ये झाले होते लग्न 
- मंजुला विवाहित होती. तिचे लग्न 2013 मध्ये वॉटर रिसोर्सेस विषयाचा विद्यार्थी रितेश विरहासोबत झाले होते. रितेश आणि त्याचे कुटुंबिय भोपाळमध्ये राहातात. 
- बिस्वाल म्हणाले की मंजुलाच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...