आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिव्य मराठी डॉट कॉम’वर करा महिलांच्या जिद्दीला सलाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली / नोएडा - यंदाच्या महिला दिनानिमित्त divyamarathi.com तुम्हाला कर्तृत्ववान महिलांच्या जोश आणि जिद्दीला सलाम करण्याची संधी देत आहे. ज्या महिलांच्या संघर्षातून आपल्याला प्रेरणा मिळते अशा महिलांच्या नामांकनासाठी तुम्ही divyamarathi.com या संकेतस्थळावर भेट देऊ शकता. हा पुरस्कार महिलांना नवी ओळख मिळवून देण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.

ज्या महिला त्यांच्या कार्यातून समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यांच्या संघर्षाची कहाणी अद्याप लोकांपर्यंत पोहोचली नाही, त्या त्यांचा संघर्ष समाजाच्या भल्यासाठी आमच्या माध्यमातून जगासोबत शेअर करू शकतात व वुमन्स प्राइड अवॉर्डसाठी नामांकन देऊ शकतात. तुमच्या अवतीभोवती सामाजिक बदलासाठी संघर्ष करणारी कुणी महिला असेल आणि ती या पुरस्कारासाठी पात्र आहे, असे आपल्याला वाटत असेल, तर तुम्हीही तिची गाथा सर्वांना सांगू शकता. या माध्यमातून समाजाच्या सर्वच स्तरांतील महिलांचे कर्तृत्व पुढे येण्याची संधी उपलब्ध होईल.

तुमच्याद्वारे पाठवण्यात आलेली अशी गाथा आमच्या तीन परीक्षक पाहतील. विजेत्या महिलांनाही त्याच सन्मानित करतील. आमच्या परीक्षक मंडळात अभिनेत्री माधुरी दीक्षित, प्रख्यात लेखिका शोभा डे, बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोम यांचा समावेश आहे.

- महिलांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आत्मविश्वास आहे. सार्मथ्यावर तसेच त्यांच्या क्षमतांवर त्यांचा विश्वास असेल, तर जगात त्यांना कोणीच रोखू शकत नाही. - शोभा डे, लेखिका

- ‘सध्याच्या परिस्थितीत महिला जास्त आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. वुमन्स प्राइड अवॉर्ड महिला जगतासाठी एक प्रकाशस्तंभासारखे आहे. ‘जैसे तील में तेल, जो चकमक में आग, तेरा साई तुझमें है, तू जाग सके तो जाग,’ अशा महिलांना नामांकन देण्यासाठी लॉग ऑन करा divyamarathi.com. - माधुरी दीक्षित, अभिनेत्री

- महिलेला दररोज संघर्षातून वाटचाल करावी लागते; परंतु त्याच्याकडे कुणाचे लक्ष जात नाही. हा पुरस्कार त्या संघर्षशील महिलांसाठी एक चांगले पाऊल आहे. - मेरी कोम, बॉक्सर चॅम्पियन