आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली : कॅनॉट प्लेस भागात ऑफिस बिल्डिंगमध्ये भर दिवसा महिलेवर बलात्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीमध्ये महिला ना दिवसाच्या उजेडात सुरक्षीत आहेत, ना सुरक्षीत समजल्या जाणार्‍या कॅनॉट प्लेस सारख्या ठिकाणी. कॅनॉट प्लेस भागात एका 34 वर्षीय महिलेवर एका बिल्डिंगमध्ये सुरक्षा रक्षकाकडून बलात्कार झाल्याची कथित घटना घडली आहे. 28 जून रोजी जीवन भारती बिल्डिंगच्या 13 व्या मजल्यावर ही घटना घडली आहे.
आरोपी सुरक्षा रक्षक रोशन सिंहला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला सात मुलांची आई आहे. तिला नोकरी मिळवून देतो असे सांगून रोशन सिंहने जीवन भारती बिल्डिंगच्या टॉवर-2 च्या 13 व्या मजल्यावर मुलाखतीसाठी नेले. महिला रुमध्ये दाखल झाल्यानंतर रोशन सिंहने दार बंद केले आणि महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर त्याने त्याच्या मित्राला फोन करुन बोलावले. त्याचा मित्र तिथे येण्याआधी महिलेने चतुराईने त्याचा मोबाईल फोन मिळवला आणि स्वतःला बाथरुमध्ये कोंडून घेतले. पीडित महिलेने तिथूनच पोलिसांना फोन केला.
दिल्लीमध्ये रोज साधारण 6 बलात्काराच्या घटना नोंदल्या जात आहेत. दिवसा ढवळ्या कॅनॉट प्लेस सारख्या भागात एका महिलेवर बलात्काराच्या या घटनेने पुन्हा एकदा दिल्ली महिलांसाठी असुरक्षीत असल्याचे अधोरेखित केले आहे. दिल्लीत बलात्काराच्या घटना घटल्या असल्याचा दिवा पोलिस करत असले तरी, 2012 नंतर अशा घटनांमध्ये 129 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

डिसेंबर 2012 मध्ये दिल्लीत एका तरुणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार झाल्यानंतर त्याचा विरोध करण्यासाठी अनेक लोक रस्त्यांवर उतरले होते. त्यानंतर बलात्काराच्या आरोपींना कडक शासन करण्यासाठी कायद्यात तरतूद केली गेली होती. 2014 च्या पहिल्या चार महिन्यात दिल्लीत रोज साधारण सहा बलात्काराच्या घटना घडत आहेत.