आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मर्दानी : 54 वर्षीय महिलेने तासभर लढत केले बिबट्याला ठार, पडले 100 हून जास्त टाके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : गढवालच्या श्रीनगरच्या रुग्णालयात बिबट्याशी लढलेल्या कमला देवींवर उपचार करणारे डॉक्टर.

नवी दिल्ली -
उत्तराखंडच्या रूद्रप्रयाग जिल्ह्यात कमला देवी नावाच्या एका 54 वर्षीय महिलेने बिबट्याशी लढा देत त्याला ठार केले आहे. या महिलेने सुमारे तास भर या बिबट्याशी लढा दिला. त्यामुळे कमलादेवी या मोठ्या प्रमाणावर जखमीही झाल्या आहेत. एका महिलेने बिबट्याशी लढा देऊन त्याला ठार केल्याचा देशातील हा पहिलाच प्रकार असावा.

बिबट्याने केलेल्या हल्ल्यात कमला देवी यांच्या शरीरावर अनेक जखमाही झाल्या आहेत. तीन ठिकाणी त्यांना फ्रॅक्चरही झाले आहे. विशेष म्हणजे एक तास बिबट्याशी लढा दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर जखमी झालेल्या कमलादेवी त्या अवस्थेत सुमारे एक किलोमीटर पायी चालत त्यांच्या गावी गेल्या. त्याठिकाणी प्रथमोपचार झाल्यानंतर त्या श्रीनगर (गढ़वाल) च्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

संघर्षानंतर बिबट्या ठार

रूद्रप्रयागच्या कोटी बोडना गावच्या कमला देवी रविवारी शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी घरी परतत असताना रस्त्यात बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. कमलादेवी यांनी मोठ्या साहसाने बिबट्याशी लढा दिला. त्यानंतर बिबट्या पळून गेला पण काही अंतरावर तो मृत अवस्थेत आढळल्याचे गावक-यांनी सांगितले.

100 हून अधिक टाके

कमला देवींवर उपचार केलेल्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेच्या शरीरावर 100 हून अधिक टाके द्यावे लागले आहेत. महिलेच्या उजव्या हाताला आणि डाव्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. तसेच त्यांच्या डोक्यावर आणि पायावर गंभीर जखमाही झाल्या आङेत. डॉक्टरांनी कमला देवी यांच्या साहसाचे कौतुक केले. एवढ्या जखमांनंतर मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होऊनही एक किलोमीटरपर्यंत चालत जाणे, हे दृढ इच्छाशक्तीचे प्रतिक असल्याचे डॉक्टर म्हणाले आहेत.

काय म्हणतात तज्ज्ञ?
एखाद्या महिलेने बिबट्याला ठार केल्याची ही देशातील पहिलीच घटना असू शकते, असे वाइल्डलाइफ एक्सपर्ट लखपत रावत यांचे म्हणणे आहे. एकतर या बिबट्याचे वय जास्त असेल किंवा तो अगदीच तरुण नवशिक्या असेल असेही ते म्हणाले आहेत. बिबट्याचा हल्ला जास्तीत जास्त दहा मिनिटांचा असतो. पण महिला जखमी झाल्याने शिकारीच्या लालचेने बिबट्याने अधिक वेळ हल्ला केला असेल, असेही ते म्हणाले.