आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Spying News In Marathi, Delhi Session Court

महिलेचा पाठलाग गुन्हा ठरवण्यात घाई,दिल्ली सत्र न्यायालयाची पुनर्विचाराची सूचना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - एखाद्याचा पाठलाग करण्याच्या प्रकाराचा अजामीनपात्र गुन्ह्यामध्ये समावेश करण्याचा निर्णय घेताना घाई करण्यात आली आहे. दिल्लीत डिसेंबर 2012 मध्ये झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर घेण्यात आलेल्या या निर्णयात अनेक पैलूंकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यावर पुन्हा गांभीर्याने विचार करणे गरजेचे असल्याचे मत दिल्लीतील सत्र न्यायालयाने व्यक्त केले आहे.


सत्र न्यायमूर्ती कामिनी लाऊ यांनी छेडछाडीच्या प्रकरणात एका व्यक्तीला दोन वर्षांची शिक्षा ठोठावताना ही टिप्पणी केली. दिल्लीतील सामूहिक बलात्कारानंतर सरकारने घाईघाईने पावले उचलली. एका गुन्हे कायद्यात दुरुस्ती अध्यादेश काढण्यात आला. त्यानुसार पाठलाग करण्याची कृती भादंविअंतर्गत अजामीनपात्र गुन्हा ठरवण्यात आला. सर्वसामान्यांची नाराजी दूर करण्यासाठी घाई करण्यात आल्याचे लाऊ यांनी म्हटेल आहे.