आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Who Attacked Delhi CM Arvind Kejriwal Yesterday

केजरींवर शाईफेक करणाऱ्या महिलेला एक दिवसाची पोलिस कोठडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अरविंद केजरीवाल यांच्यावर शाईफेक करणाऱ्या भावना अरोराला सोमवारी रोहिणी कोर्टाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आम आदमी पार्टीने केजरीवाल यांच्या सुरक्षेत झालेल्या गलथणपणासाठी भाजप आणि पंतप्रधान कार्यालयाला जबाबदार ठरविले आहे. दरम्यान, दिल्लीचे परिवहन मंत्री गोपाल राय यांनी भावना उल्लेख करत असलेल्या प्रकरणाचा दिल्ली सरकारशी संबंध नाही. हे प्रकरण केंद्र सरकारत्या आधीन येते असे स्पष्ट केले आहे.

भावनाने पहिले कागद फेकले नंतर शाई
सम-विषम योजनेच्या यशस्वीतेसाठी जनतेचे आभार मानण्याकरिता रविवारी छत्रसाल स्टेडियममध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भाषण करत असताना भावना मंचाजवळ आली. तिने केजरीवाल यांच्या दिशेने कागद फेकले आणि नंतर शाई फेकली. पोलिसांनी तिला त्याच क्षणी ताब्यात घेतले. केजरीवालांनी मंचावरुनच तिला सोडून देण्यास सांगितले. ते म्हणाले, ती काही घोटाळा झाल्याचे म्हणत आहे, तिच्याकडील कागद घ्या आणि तिला सोडून द्या.
पोलिसांनी रविवारी भावनाला मॅजिस्ट्रेटसमोर उभे केले. त्यांनी तिला सोमवारी कोर्टात हजर राहाण्यास सांगून, रात्रभरासाठी पोलिसांच्या पाहाऱ्यात घरी पाठवले.

कोण आहे शाई फेक करणारी भावना अरोरा
- भावनाचे म्हणणे आहे, की ती आम आदमी सेनेची पंजाब प्रभारी आहे.
- तिचा आरोप आहे, की सम-विषम योजनेत सीएनजीचा मोठा घोटाळा झाला. त्यासंबंधीचे पुरावे आणि स्टिंग केल्याचा तिचा दावा आहे. ते कोर्टात सादर करणार असल्याचे ती म्हणते.
- भावना म्हणाली, हे पुरावे घेऊन मी आप नेत्यांकडे गेले होते, मात्र त्यांनी भेटण्यास नकार दिला.

आप नेते काय म्हणतात
- पक्षाचे प्रवक्ते आशुतोष सोमवारी म्हणाले, हे केजरीवालांच्या हत्येचे षडयंत्र असू शकते.
- केजरीवालांना झेड दर्जाची सुरक्षा असताना ती महिला तिथपर्यंत कशी पोहोचू शकते, असा त्यांचा सवाल आहे. आशुतोष म्हणाले, आमच्याविरोधात फार मोठे षडयंत्र सुरु आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, व्हिडिओ