आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: वरिष्ठपदी महिला नियुक्तीकडे वाढता कल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चूल आणि मूल यांच्या व्यवस्थापनात पारंगत असलेल्या महिला आता कंपनी, संस्थांचे व्यवस्थापन सक्षमपणे करतात हे सिद्ध झाले आहे. त्यामुळेच व्यवस्थापक तसेच वरिष्ठपदी महिला असावी याकडे कंपन्यांचा कल वाढत अाहे. आयआयएमजॉब्ज डॉट कॉमने केलेल्या सर्वेक्षणातून हे समोर आले आहे.

विविध संस्थांतील वरिष्ठ पदांसाठी अर्ज करणा-या महिलांच्या प्रमाणात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा जवळपास दुप्पट वाढ झाली असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. आयआयएम जॉब्जच्या सर्वेक्षणानुसार, विविध संस्थांतील वरिष्ठ पदांसाठी अर्ज करणा-या महिलांचे प्रमाण २०१३ मध्ये फक्त दहा टक्के होते. ज्या पदांसाठी १० ते १५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे, अशा पदांसाठी येणा-या अर्जांचा विचार यासाठी करण्यात आला आहे.

यात २०१४ मध्ये १५.३ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून आले. दोन वर्षांत या प्रमाणात जवळपास तिप्पट वाढ झाली आहे. देशातील विविध कंपन्या व संस्थांतील वरिष्ठ पदांसाठीचे वैविध्यीकरण यातून स्पष्ट होते. यातून सर्वसमावेशकता साधत महिला सबलीकरणाला चांगला हातभार लाभणार आहे.

महिलांचे नेतृत्व सक्षम : नेतृत्वपदी महिला असतील तर त्याचे मूर्त परिणाम संस्थेच्या आर्थिक व बौद्धिक क्षेत्रात दिसतात असे समजल्याने त्यांना लीडरशिप देण्याकडे नियाेक्त्यांचा कल आहे. तरुण मत्ता, संस्थापक, आयआयएम जॉब्ज डॉट कॉम
पुढील स्लाईडवर वाचा, या क्षेत्राकडे वाढला कल....