आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅलेंजिंग नोकरी करणा-या महिलांची संख्या वाढली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - घर आणि नोकरी दोन्ही पातळ्यांवर तारेवरची कसरत करणाºया महिला आता नोकरीच्या क्षेत्रात मोठी आव्हाने पेलण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. जास्त ताण असलेली कामे, एखाद्या प्रकल्पासाठी दिवसातील जास्तीत जास्त तास देणे, तसेच फिरतीची किंवा परगावी दौ-याची कामे करणे अशा नोक-यांमध्ये काम करणा-या महिलांची संख्या वाढली असल्याचे नुकत्याच एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. करिअरबिल्ड डॉटकॉम या नोकरभरती करणा-या संस्थेने हे अध्ययन केले आहे. सर्वेक्षणातील अहवालानुसार देशातील दोन तृतीयांश महिला नोकरदार आता फिरतीची कामे करण्यासाठी तयार आहेत, तर 33 टक्के महिला जास्त ताण असलेल्या नोकरीला पसंती देतात.

नोकरी आणि घर सांभाळण्यात सक्षम : घर आणि नोकरीचे उत्तम व्यवस्थापन करण्यात महिला समर्थ असल्याचे तज्ज्ञांनीही मान्य केले आहे. आजकाल महिला मागे न राहता जास्त जोखमीची कामे पत्करण्यास तयार असतात. किंबहुना घर आणि आॅफिसमधील कामे लीलया सांभाळण्यास त्या समर्थ असतात, असे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील
नॉलॅरिटी या कंपनीचे सीईओ अंबरीश गुप्ता यांनी सांगितले.

युनिसन इंटरनॅशनल कन्सल्टिंग या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक उदित मित्तल म्हणाले, अनेक कंपन्या तर काही पदांसाठी पुरुषांपेक्षा महिलांनाच प्राधान्य देतात. कुटुंबातील इतर सदस्यांचाही मोठा पाठिंबा असल्यामुळे महिलांना घरात बसून राहण्यापेक्षा नोकरीवर जाण्यासाठी त्यांच्याकडून प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळेच शिक्षणाचा चांगला उपयोग करत महिला आव्हानात्मक नोकरी करण्यासाठी सज्ज होत आहेत.

मनुष्यबळ विशेषज्ञ तसेच नीनो बँबिनो संस्थेच्या क्रिएटिव्ह डायरेक्टर शिखा कुमार सांगतात की, ‘‘नोकरी करणाºया महिलांना कामात लक्ष केंद्रित करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांच्या आधाराची गरज असते. स्वबळावर एखादी संस्था चालवायची असल्यास कुटुंबाच्या पाठिंब्याची जास्त गरज असते. माझ्या पाठीशी माझे कुटुंब आहे, त्यामुळेच मी तीन वर्षांची मुलगी घरी सोडून दिवसातील जास्तीत जास्त वेळ संस्थेसाठी देऊ शकते.’’

कुटुंबाचा भक्कम आधार
नोकरीसाठी बाहेर पडणा-या महिलेला आव्हानात्मक आणि जोखमीची कामे करण्यासाठी कुटुंबाचा भक्कम आधार असल्याचे मत बहुतांश महिलांनी व्यक्त केले आहे.